|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ट्रक उलटल्याने दोन लाखाचे नुकसान

ट्रक उलटल्याने दोन लाखाचे नुकसान 

प्रतिनिधी /म्हापसा :

पणजीहून करासवाडा मार्गे जाणारा ट्रक जीए. 08 यु 9269 हा गिरी येथे अचानक उलटल्याने ट्रकचे बरेच नुकसान झाले आहे.

अमित नरेश सिंग हा ट्रक चालक कोको कॉलाच्या बाटल्या घेऊन जात असता ग्रीन पार्क हॉटेलजवळ पोचल्यावर अचानक ब्रेक लावल्याने गतीबरोबर ट्रक रस्त्यावर उलटला. यावेळी सर्व बाटल्या रस्त्यावर पसरल्या. यात बाटल्या व ट्रकचे मिळून सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले आहे. म्हापसा पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केला.

Related posts: