|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राजधानीत आज कार्निव्हल मिरवणूक

राजधानीत आज कार्निव्हल मिरवणूक 

प्रतिनिधी/ पणजी

‘खा, प्या मजा करा’ असा संदेश देणारा कार्निव्हल महोत्सव आज शनिवार 25 फेब्रुवारीपासून गोव्यात सुरू होत असून पहिली चित्ररथ मिरवणूक आज पणजीत होणार आहे. हा महोत्सव 28 फेबुवारीपर्यंत म्हणजे एकूण 4 दिवस चालणार असून इतर वास्को, मडगांव, म्हापसा, फोंडा शहरातही मिरवणुका काढण्यात येणार आहेत.

राजधानी पणजीतील मिरवणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली असून मिरवणुकीचा मार्ग सजवण्यात आला आहे. पणजी कार्निव्हलसाठी 57 चित्ररथांची नोंदणी झाली असून जुन्या सचिवालया समोर मुख्य सचिव धर्मेद्र शर्मा हे शुभारंभ करणार आहेत. दुपारी 3.30 वाजल्यानंतर मिरवणूक चालू होणार असून त्यासाठी देशी-विदेशी पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. मांडवी नदीच्या किनारी असलेल्या भाऊसाहेब बांदोडकर मार्गाने ही मिरवणूक जाणार असून त्या मार्गावर ठिकठिकाणी निमंत्रिकांची बसण्याची सोय करण्यात आली आहे.

मांडवी पुलाखाली सर्व चित्ररथ, नृत्य पथके जमा होणार असून त्यानंतर ते कला अकादमीपर्यंत मिरवणुकीने पुढे जाणार आहेत. हा रस्ता दुपारी 3 वाजल्यापासून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात येणार असून मिरवणूक संपेपर्यंत तो बंदच रहाणार आहे. कार्निव्हल मिरवणुकीसाठी वाहतुकीत बदल केला असून त्याचे पालन वाहन चालकांना करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

यंदा कार्निव्हलचे 50 वे म्हणजे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून चित्ररथ मिरवणुकीचा मार्ग बदलून तो मिरामार दोनापावला असा करण्याचा प्रस्ताव होता. तथापि येथील कामे अर्धवट असून पूर्ण न झाल्याने शेवटी पारंपरिक मार्गच ठरवण्यात आला आहे.

 

Related posts: