|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » म्हापसा पालिकेकडून 19 कोटीचा कर वसूल

म्हापसा पालिकेकडून 19 कोटीचा कर वसूल 

प्रतिनिधी / म्हापसा

म्हापसा पालिकेने यंदा विविध कराच्या रूपाने सुमारे 19 कोटी 28 रूपये महसूल गोळा केला असून थकबाकी वसुलीसाठी सुमारे 10 हजार लोकांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहे. मार्च अखेर पर्यंतच्या कालावधीत महसुलात आणखी मोठय़ा रक्कमेची भर पडेल.

  पालिकेने आर्थिक वर्षांत बुधवारपर्यंत घरपट्टी कर 3 कोटी 3 लाख 89 हजार 332 रूपये वसूल केला असून पैकी 26 लाख 35 हजार 949 रू. दत्तवाडी व करासवाडा औद्योगिक वसाहतीकडून प्राप्त झाला आहे. कचरा कर 71 लाख 45,239रू. व्यवसाय परवाना 35 लाख 98 हजार 425रू., साईनबोर्ड कर 12 लाख 58 हजार 182 रूपये, जाहिरात फलक 2 लाख 35 हजार 681 रूपये, रू.,कर 6 लाख 37 हजार 570 रू। मोबाईल टॉवर कर 2 लाख 68 हजार 680 रू., पालिका क्षेत्रांतील दुकान इतर आस्थापनांचा भाडे कर 2 कोटी 60 लाख 89 हजार 125 रू., मार्केटमधील दुकान भाडे 1 कोटी 2 लाख 840 रू. पे पार्किंग 6 लाख 87 हजार 102 रू. ऑक्ट्रॉय कर 2 कोटी 52 लाख 73 हजार  रू. मार्केटमधील दुकाने हस्तांतरण फी 15 लाख 30 हजार 903 रू, थकित कर वसुलीसाठी पाठविण्यात आलेल्या नोटीसा व वॉरन्ट फीच्या रूपात 98 लाख 400 रू. पाणी व वीज ना हरकत दाखला फी 4 लाख 38 हजार 100 रू. यासह इतर करांचा समावेश आहे. थकीत कर वसुलीसाठी सुमारे 10 हजार लोकांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत.

  पालिकेला दरवर्षी सरकारकडून विविध विकास कामे व कर्मचाऱयांच्या वेतनासाठी सुमारे 3 कोटी रू. निधी मिळतो. यंदा 3 कोटी 50 लाख 50 हजार रू. निधी सरकारने पालिकेला दिला आहे. यात 38 लाख 60 हजार रूपये कर्मचारी वेतन निधी. 2 कोटी 21 लाख 14 हजार डी ए अनुदान निधी, 89 लाख 56 हजार जीआए अनुदान निधी व इतर निधीचा समावेश आहे. शिवाय गोवा राज्य नागरी एजन्सी (सुडा) तर्फे पालिका क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात विकास कामे हाती घेण्यात आली आहेत.

 कर्मचाऱयांच्या चोख कामामुळे वसुलीत यश – भानुदास नाईक

पालिकेने लेखा कार्यालय, करवसुली अधिकारी व इतर कर्मचाऱयाच्या सहाय्याने करवसुली परंपरा चालूच ठेवली आहे. यंदा थकीत घरपट्टी करवसुलीसाठी मोहिम राबविण्यात आली आहे. अनेकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. घरपट्टी वसुलीसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असला तरी कर्मचाऱयांच्या चोख कामामुळे मोठी वसुली करण्यास पालिका यशस्वी ठरली आहे. असे सांगून मोबाईल टॉवरच्या फी वसुलीसाठी खास पथकाची नियुक्ती करून मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे लेखा तथा प्रशासकीय अधिकारी भानुदास नाईक यांनी दिली.

Related posts: