|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वास्कोत कार्निव्हल चित्ररथ मिरवणुक उत्साहात

वास्कोत कार्निव्हल चित्ररथ मिरवणुक उत्साहात 

प्रतिनिधी / वास्को

वास्को शहरात सोमवारी संध्याकाळी कार्निव्हल चित्ररथ मिरवणुक हजारो नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. स्वतंत्रपथ मार्गाच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी या मिरवणुकीतील चित्ररथांचा आस्वाद घेतला. एकूण 64 पथके या मिरवणुकीत सहभागी झाली होती. वास्को कार्निव्हल उत्सव समितीच्या अध्यक्षा मुख्याधिकारी दीपाली नाईक यांनी बावटा दाखवून कार्निव्हल मिरवणुकीला प्रारंभ केला.

या कार्निव्हल चित्ररथ मिरवणुकीला वर्षपध्दतीप्रमाणे वास्कोतील सेंट ऍण्ड्रय़ू चर्चसमोरील हुतात्मा चौकातून सुरूवात झाली. वास्को कानिव्हल उत्सव समितीच्या अध्यक्ष मुख्याधिकारी दीपाली नाईक यांनी संध्याकाळी 4.30 वा. कार्निव्हल उत्सव समितीचे उपाध्यक्ष सॅबी मास्कारेन्हस, कार्यकारी सदस्य पोलीस उपअधीक्षक लॉरेन्स डिसोजा, अबकारी निरीक्षक मुकूंद गावस, पालिका अभियंते मनोज आर्सेकर, पोलीस निरीक्षक नालास्को रापोझ व इतर अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत मिरवणुकीला हिरवा बावटा दाखवला.  एकूण 64 पथकांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला होता. सायंकाळी साडेसातच्या सुमारास मिरवणुकीची सांगता झाली. संपूर्ण गोव्यातील पथकांचा यात समावेश होता. गोव्यातील परंपरेवर आधारीत विविध चित्ररथ सहभागी झाले होते. पारंपारीक गट – 8, विदुषक गटात-16, संस्था आणि क्लब- 17, जंक कार- 9, कौटुंबिक – 12, पुरस्कर्ते – 2 स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्वतंत्र पथ मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून हजारो नागरिकांनी या मिरवणुकीचा आस्वाद घेतला. 

जोशी चौकात उभारलेल्या व्यासपीठावर वास्को कार्निव्हल उत्सव समितीच्या अध्यक्ष मुख्याधिकारी दीपाली नाईक, कार्निव्हल उत्सव समितीचे उपाध्यक्ष सॅबी मास्कारेन्हस, इतर पदाधिकारी व समितीचे कार्यकारी सदस्य पोलीस उपअधीक्षक लॉरेन्स डिसोजा, अबकारी निरीक्षक मुकूंद गावस, पालिका अभियंते मनोज आर्सेकर, पोलीस निरीक्षक नालास्को रापोझ व इतर अधिकारी उपस्थित होते. कार्निव्हल चित्ररथ मिरवणुक शांततेत व उत्साहात पार पडली.

चित्ररथ मिरवणुकीला नागरिकांचा मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळाला. दर वर्षी संध्याकाळी साडे सहाच्या दरम्यान संपणारी ही मिरवणुक यंदा साडे सातच्या सुमारास संपली. हजारोंच्या उपस्थितीमुळे शहरातील व्यवस्थेवर प्रचंड ताण व गोंधळ निर्माण झाला. रात्री आठनंतर परिस्थिती पूर्वपदावर आली.

आज मंगळवारी दि. 28 रोजी सायंकाळी 6.30 वा. पालिका इमारतीसमोर संगीताचा कार्यक्रम तसेच जॉन डिसील्वा यांच्या ‘कॉमेडी शो’ ने उत्सवाची सांगता होईल.