|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सौंदत्ती येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार

सौंदत्ती येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार 

प्रतिनिधी / बेळगाव

सौंदत्ती येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला आहे. लग्नाचे आमिष दाखवून अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. यासंबंधी तिघा जणांविरुध्द सौंदत्ती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्रस्त मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

बुधवार दि. 22 फेब्रुवारी रोजी अपहरण करुन एका 17 वषीय मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. यासंबंधी बसवराज शंकऱयाप्पा होसनमी, राजू सहदेव यड्रावी (दोघेही रा. बेटसूर) व मल्लव्वा जालगार (रा. साईनगर, हुबळी) या तिघा जणांविरुध्द अपहरण, बलात्कार व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्रस्त मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बसवराज होसमनी या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून त्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला आहे. सौंदत्ती पोलीस पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी या संबंधी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.

दरम्यान सौंदत्ती तालुक्मयातील गुर्लहोसूर येथील एका 24 वषीय महिलेवर बलात्कार झाला आहे. त्या त्रस्त महिलेला सोमवारी पहाटे वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून या दोन्ही प्रकरणांचा सौंदत्ती पोलीस तपास करीत आहेत.