|Monday, February 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कुडाळात बँक कर्मचाऱयांचा मोर्चा

कुडाळात बँक कर्मचाऱयांचा मोर्चा 

कुडाळमोदी सरकारने नोटाबंदी अंमलात आणली. पण कोटय़वधीची थकबाकी आहे. त्या थकबाकीदारांवर कोणतीही कारवाईची तरतूद केली नाही. सर्व थकबाकीदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, या व अन्य मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने मंगळवारी कुडाळ शहरात मोर्चा काढला.

 बँक कर्मचाऱयांनी आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज मोर्चा काढून लाक्षणिक संप केला. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे कॉ. संतोष रानडे, कॉ. नंदकुमार प्रभू व कॉ. लक्ष्मण चौकेकर यांच्या नेतृत्वाखाली बँक कर्मचारी संपात सहभागी झाले होते. नोटाबंदीच्या पन्नास दिवसांच्या कालावधीत केलेल्या कामाचा सर्व बँक कर्मचाऱयांना मोबदला मिळाला पाहिजे, सरकारच्या कामगार कायद्यात बदल सुचविणाऱया विधेयकाला विरोध, नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांवर झालेल्या परिणामांची दखल घ्यावी, बँक विलिनीकरण थांबवावे, थकीत कर्ज वसुलीबाबत सरकारने कडक धोरण स्वीकारावे आदी प्रमुख मागण्यांसाठी संप असल्याचे सांगण्यात आले. येथील बँक ऑफ इंडिया येथून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. घोषणा देत स्टेट बँक येथपर्यंत मोर्चा काढण्यात आला. यात रवी परब, दीपक बागवे, राघोबा धुरी, नीता गोवेकर, जयेश पारकर, रमेश चिंदरकर, राजू पालव, उमेश नाडकर्णी, रमेश कुडाळकर, श्रीमती हळदणकर यांच्यासह युनियनचे पदाधिकारी व बँक अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. पदाधिकाऱयांनी मार्गदर्शन केले.

Related posts: