|Monday, September 16, 2019
You are here: Home » क्रिडा » बीसीसीआयला होणार 20 हजार डॉलर्सचा दंड?

बीसीसीआयला होणार 20 हजार डॉलर्सचा दंड? 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पुण्यातील खेळपट्टी खराब असल्याचे सिद्ध झाल्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला 20 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्सच्या दंडाला सामोरे जाण्याचा धोका असेल, असे संकेत बुधवारी प्राप्त झाले आहेत. माजी फिरकीपटू शेन वॉर्नने तर पुण्याची खेळपट्टी मंगळाच्या पृष्ठभागासारखी आहे, अशी खरमरीत टीका केली असून यामुळे बीसीसीआयचे आयसीसीला उत्तर काय असेल, याची प्रतीक्षा असणार आहे. सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी पुण्यातील खेळपट्टी खराब असल्याचा अहवाल दिला असून याला उत्तर देण्यासाठी आयसीसीने बीसीसीआयला 14 दिवसांची मुदत दिली आहे. दरम्यान, एका स्थानिक दैनिकातील वृत्तानुसार, पिच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांच्यावर बीसीसीआय मुख्य क्युरेटर दलजीत सिंग यांच्याकडून काही सूचना होत्या, असा दावा केला गेला आहे. याप्रकरणी आयसीसी बीसीसीआयला फक्त समज देऊ शकते. किंवा त्यांच्यावर 20 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा दंडही ठोठावू शकते, असे संकेत आहेत.