|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » बालगायिकांच्या गीत रामायणाने सातारकर मंत्रमुग्ध

बालगायिकांच्या गीत रामायणाने सातारकर मंत्रमुग्ध 

बालगायिकांच्या गीत रामायणाने सातारकर मंत्रमुग्ध

प्रतिनिधी/ सातारा

लवकुश रामायण गाती, राम जन्मला गं सखे.. या सारख्या अजरामर अशा राम गीतांनी सातारकरांची रविवारची संध्याकाळ मंत्रमुग्ध झाली. औचित्य होते ग. दि. माडगूळकरांचे काव्य आणि संगीतकार बाबूजी उर्फ सुधीर फडके यांच्या संगीताने अजरामर झालेल्या गीत रामायणाचे..

 सातारा येथील न्यू इंग्लिश स्कुलच्या गणेश हॉलमध्ये रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्टचे वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कराड येथील स्व. रा.कि. लाहोटी कन्या प्रशालेच्या शालेय विद्यार्थिनींनी हे गीत रामायण सादर केले.

 सादर करण्यात आलेल्या गीतांची सुरवात पं. शौनक अभिषेकी यांच्या नादातून या नाद निर्मितो, श्रीराम जयराम जयजयराम.. या गीताने झाली. नंतर स्वये श्री राम प्रभू, शरयू तीरावरी, उगा का काळीज, दशरथा घे हे, राम जन्मला, सावळा गं रामचंद्र, ज्येष्ठ तुझा पत्र, स्वयंवर झाले सीतेचे, निरोप कसला, जय गंगे, माता न तू वैरिणी, पराधीन आहे जगती, मज आणूनी द्या तो, सेतू बांधा रे सागरी, त्रिवार जयजयकार आणि गा बाळांनो या 16 गीतांचे सुंदर सादरीकरण करण्यात आले. 

  या कार्यक्रमाची संहिता अभिजीत कुलकर्णी यांची होती तर तबला साथ अमृत गेजरे, हार्मोनियम साथ श्रीरंग कुलकर्णी यांनी दिली. व्हायोलिन साथ पं. केदार गुळवणी व तालवाद्ये साथ रमा, आर्या, ईश्वरी, अस्मिता व अनन्या यांनी केली. या कार्यंक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन अदिती फडके यांचे होते. या कार्यक्रमात  इयत्ता 5 वी ते 9 मधील विद्याथिंनीने निवडक गीते सादर केली. गीत गायनात  रमा ताम्हणकर, आर्या कुलकर्णी, श्रध्दा जाधव, एला कुलकर्णी, अस्मिता पावनगडकर, अनन्या मालेकर, ईश्वरी देव, मैथिली डोईफोडे, ऋचा जंगम, श्रेया शेंडे व मृगा जोशी यांनी साथ केली तर तितकेच ओघवते निवेदनाचे काम अवंतिका कोठावळे, ऋतुजा वाघमोडे आणि निकीता शिर्पें यांनी केले. 

  यावेळी प्रास्ताविकात अरुण गोडबेले यांनी, गीतरामायण हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे. मराठी मनावर गेली 60 वर्षानंतरही ही मोहिनी कायम आहे. या कार्यंक्रमाचे कराडकरांनी अतिशय कौतुक केले म्हणून हा कार्यंक्रम खास सातारकरांसाठी आयाजित करण्यात आला होता. तसेच रा. ना गोडबोले ट्रस्टच्या सांस्कृतिक कार्याचा भाग म्हणून हा कार्यंक्रम येथे विनामूल्य सादर करण्यात आला. विद्याथिंनींच्या कलागुणांचे कौतुक व त्याना प्रोत्साहन मिळावे, यासाठी हे आयोजन करण्यात आले होते.

 या कार्यक्रमास कराड शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी, सचिव चंद्रशेखर देशपांडे यांचे विशेष सहकार्य लाभले. 

 यावेळी डॉ. हेमंत ताम्हणकर, डॉ. गौरी ताम्हणकर, माजी नगराध्यक्ष  डॉ. अच्युत गोडबोले, उदयन गोडबोले, प्रद्युम्न गोडबोले, संजीवनी गोडबोले, अनुपमा गोडबोले, डॉ. अनुराधा गोडबोले, किशोर नावंधर, गौतम  भोसले, दत्ता डोईफोडे, अनील वाळींबे, सुधीर पाध्ये, डॉ. स्वाती श्रोत्री, सुवर्णा देशपांडे, प्रदीप चव्हाण यांचे सह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आदिती फडके यांनी   आभार मानले. 

 

Related posts: