|Sunday, January 26, 2020
You are here: Home » उद्योग » सेवा क्षेत्रात दमदार तेजी

सेवा क्षेत्रात दमदार तेजी 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

फेब्रुवारी महिन्यात देशातील सेवा क्षेत्रात सुधारणा दिसून आली. सेवा क्षेत्रात आलेली तेजी गेल्या वर्षाच्या ऑक्टोबरनंतर फेबुवारीमध्ये चांगलीच दिसून आली. केंद्र सरकारकडून नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्याने पहिल्या तीन महिन्यात या क्षेत्रातील संबंधित व्यवसायांत घसरण दिसून आली होती.

निक्केई इंडिया सर्व्हिस पर्चेसिंग मॅनेजर इन्डेक्स हा फेब्रुवारी महिन्यात 50.3 वर पोहोचला आहे. जानेवारी महिन्यात हा निर्देशांक 48.7 वर होता. नोव्हेंबर महिन्यात हा निर्देशाकं तीन वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. जून 2015 नंतर पहिल्यांदाच सर्वात मोठी मासिक घसरण झाली. कारखान्यातील उत्पादन फेब्रुवारी महिन्यात सलग दुसऱया महिन्यात वाढला. मात्र सेवा क्षेत्रात पुढील वर्षासाठी आऊटलूक अजूनही आहे. बाजारातील स्पर्धा अजूनही कायम आहे. कर्मचाऱयांची कपात करण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे.

Related posts: