|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कॅन्सर साक्षर अभियानाचा जिल्हय़ात पायलट प्रोजेक्ट

कॅन्सर साक्षर अभियानाचा जिल्हय़ात पायलट प्रोजेक्ट 

विशाल कदम/ सातारा

असंसर्गित रोगनियंत्रण या कार्यक्रमातंर्गत सातारा जिह्याचा राज्यामध्ये कॅन्सर साक्षर अभियानासाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून निवड केली आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी व कॅन्सर पिडितांना आधार देण्यासाठी जिह्यात आशांताईंमार्फत सर्व्हे केला जाणार आहे. याची सुरुवात सध्या प्राथमिक स्तरावर सातारा तालुक्यातील परळी आणि चिंचणेर वंदन या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून सुरु करण्यात येणार आहे. याचे नियोजन केले आहे, याचा आढावा घेण्यासाठी दस्तुरखुद्द आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. साधना तायडे यांनी जिल्हा परिषदेला भेट दिली. त्यामुळे आता कॅन्सरपिडीतांवर उपचारही याद्वारे होणार असल्याचे समजते.

सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने अनेक चांगली कामे केली आहेत. विद्यमान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी केलेल्या कामांमुळेच जिल्हा परिषदेच्या सीईओ डॉ. राजेश देशमुख यांनीही प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या गेल्या. राज्याच्या आरोग्य विभागामार्फत नव्यानेच कॅन्सर पिडितांसाठी वैद्यकीय उपचार व तपासणीच्या अनुषंगाने अभियान राबवण्याबाबत हालचाली सुरु झाल्या. असंसर्गजन्य रोगनियंत्रण या कार्यक्रमातर्गंत कॅन्सर साक्षर जिल्हा या नावाने अभियान हाती घेण्याचे पुढे आले. त्यामध्ये राज्यातील चार जिह्यांची नावे पुढे आली होती. जेथील वैद्यकीय केंद्रांची सध्याची परिस्थिती, रुग्णांना दिल्या जाणाऱया सोयी याबाबीच आढावा घेतल्यानंतर साताऱयाची निवड करण्यात आली.

सातारा जिह्याचा समावेश यामध्ये झाल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई यांनी  जिह्यातील 71 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णांमध्ये हे अभियान सुरु करण्यापूर्वी सातारा तालुक्यातील परळी आणि चिंचणेर वंदन या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये यशस्वी राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तशा सूचना देण्यात आल्या. जिह्यातील सर्व आशांना बोलवून त्यावर कसा सर्व्हे करायचा हेही सांगण्यात आले. दरम्यान, जिल्हा परिषदेत हे सर्व्हे सुरु असताना सहसंचालक डॉ. तायडे यांनी अचानक भेट देवून आढावा घेतला आणि कौतुकाची थाप दिली.

Related posts: