|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जिल्हा बँकेच्या समित्यांमधून उदयनराजेंची हकालपट्टी

जिल्हा बँकेच्या समित्यांमधून उदयनराजेंची हकालपट्टी 

दीपक प्रभावळकर / सातारा

सातारा जिल्हा बँकेच्या राजकारणात साताऱयातील मनोमिलन गेल्या दहा वर्षांपासून चांगलेच घोंगावत होते. मात्र डिसेंबर 2016 ला ऐतिहासिक मनोमिलन संपुष्टात आले. त्यानंतर खासदार उदयनराजेंनी पालिकेवर आपल्या गटाचा झेंडा फडकवला तर आमदार शिवेंद्रराजेंनी पंचायत समितीवर वर्चस्व मिळवलं. मनोमिलन तुटल्यानंतर नक्की कोणाचा किती फायदा झाला, अन् कोणाचा किती तोटा झाला या एकमेव चर्चेत दोन्ही राजांचे कार्यकर्ते पुर्णवेळ गुंतलेले आहेत. दरम्यान, मनोमिलन तुटीच्या भुपंपाचे धक्के जाणवत असतानाच जिल्हय़ाची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा बँकेच्या सर्व समित्यांमधून उदयनराजेंची अध्यक्ष शिवेंद्रराजेंनी हकालपट्टी करण्यात आल्याचे समोर आले आहे. याला पक्षपातळीवर त्याला मान्यताही घेतली असल्याचे समजते.

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्याआधी तो स्वराज्याची राजधानी आहे. त्यामुळे इथल्या राजकारणात छत्रपती शिवरायांच्या घराण्याला अनन्यसाधारण महत्व मिळते आहे. स्वर्गिय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या ऐन काळात हे घराणे सक्रिय राजकारणात नव्हते. बाराव्या पिढीपासूनच स्वतंत्र देशाच्या सक्रिय राजकारणात या घराण्याचा दबदबा वाढला. मात्र घराण्यात उभा दावा ठोकल्यासारखी परिस्थिती होती.

दहा वर्षांपुर्वीच्या पालिका निवडणूकीनंतर उदयनराजे व शिवेंद्रराजे यांनी हा वाद संपुष्टात आणून ‘मनोमिलन’ केले. त्यानंतर लोकसभा, विधानसभा, जिल्हा बॅंक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, कारखाना या साऱयावर या दोघांचीच सत्ता होती. 28 ऑक्टोंबर 2016 हा दिवस पुन्हा तितकाच ऐतिहासिक ठरला. दहा वर्षांपुवीचे मनोमिलन संपुष्टात आल्याची घोषणा करण्यात आली.

पालिका निवडणूकांची पार्श्वभुमी लाभलेल्या या भुकंपात बाजार समितीलाही धक्के बसले. उदयराजेंनी आपल्या समर्थकांना राजीनामे द्यायचे फर्मान काढले. मोठय़ा निकराने झालेल्या या निवडणूकीत शिवेंद्रराजेंच्या पत्नी वेदांतिकाराजे भोसले यांना पराभूत करत उदयराजे गटाने पालिकेत एकहाती सत्ता घेतली.

पराभव त्यातही पत्नीचा… त्यामुळे संतापलेल्या शिवेंद्रराजेंनी मग ‘दहशतवाद मोडीत काढा, मी आहे तुमच्याबरोबर’ या आशयाचा प्रचार करायला सुरूवात केली. त्यांनी त्याच त्वेषात सातारा व जावली या दोन्ही पंचायत समित्यांवर वर्चस्व मिळवले.

जिल्हा बँकेत उदयराजे आहेत तरी

 कोणत्या पॅनेलचे?

मनोमिलन असातानाच्या काळात निवडणूक झालेली जिल्हा बँक तरी या धक्कांपासून मागे कशी राहील? वास्तविक बँकेत उदयनराजे बिनविरोध निवडणून आलेत. त्यामुळे ते सत्ताधारी पॅनेलचे कि विरोधी पॅनेलचे याबाबत वाद असू शकतो. सुरूवातीला उदयराजेंना जिल्हा बँकेच्या कोणत्याच समित्यांमधे घेतलेले नव्हते. मग ही बाब त्यांनी नेते शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पवार साहेबांनी काही सुचना केल्या व उदयनराजेंसह विलासकाका उंडाळकर यांनी बहुतेक सर्वच समित्यांवर घेण्यात आले.

शिवेंदराजेंनी घेतला समित्यांच्या नेमणूकीचा निर्णय

आमदार जयकुमार गोरेंनी जिल्हा बँकेसमोर उपोषण केले तेंव्हा त्यांची ‘आस्थेवाईकतेने’ उदयनराजेंनी भेट घेतलेली. या साऱया पुर्वपिठीकेवर जानेवारी 2017 मधे जनरल बॉडीची बैठक झाली व प्रथेप्रमाणे बॉडीने समित्या नेमायचे सारे अधिकार ‘चेअरमन’ यांना बहाल केले.

त्याप्रमाणे शिवेंद्रराजेंनी आपल्या चेअरमनकीच्या हक्कातून उदयनराजेंना नियोजन समिती, कार्यकारणी समिती अशा महत्वाच्या समित्यांसह सर्वच समित्यांमधून हलाकपट्टी केली. त्यामुळे ते आता केवळ संचालक म्हणून कार्यरत राहू शकतात. गंमत म्हणजे सुरूवातीला समित्यांमधे उदयराजे नाहीत हे लक्षात आल्यावर पवारसाहेबांनी सुचना केल्याने त्यांना विविध समित्यांवर घेतले गेले होते. त्यामुळे आता समित्यांमधून बाजुला करताना त्यांच्या कानावर घालण्याचे पक्षीय सोपस्कार पुर्णत्वाला नेले आहेत.

मनोमिलन तुटल्यानंतर अनेक राजकिय घटना, घडामोडी सुरू असून सहकारातील ही मोठी घटना राजकारण्यांना माहित होती, पण सामान्यांच्या नजरेआड-डोळय़ाआड ठेवण्यात आली होती.

Related posts: