|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पोलिसांना मिळणार हक्कांची घरे : विश्वास नांगरे पाटील

पोलिसांना मिळणार हक्कांची घरे : विश्वास नांगरे पाटील 

पंढरपूर / प्रतिनिधी

प्रत्येकाला ‘आपलं’ घरं असावं असे वाटत असते. असेच काहीसे स्वप्न पोलिस कर्मचा-यांचे पूर्ण होणार आहे. पोलिस कर्मचा-यांना कोणत्या परिस्थितीत रहावे लागते. यांचा अनुभव मी घेतला आहे. माझे मामा पोलिस कर्मचारी होते. ते मी लहानपणी पाहीले , अनुभवले आहे. नशिबाने आज अशाकाही पोलिस कर्मचा-यांची घरे बांधण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. असे सांगत कोल्हापूर परिक्षेत्रांचे विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील काहीसे भावनावष झाले.  

  पंढरपूर येथे सोलापूर ग्रामीण पोलिसांची तपासणी करण्यासाठी नांगरे पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी ते पुढे म्हणाले , नोकरीवर असताना प्रत्येक पोलिसांना एक हक्कांचे आणि सुरक्षेचे स्वत :च्या कुटुबासाठी घरं हवे असते. मात्र ते सरकारच्या थोडयाथोडक्या घरांमुळे शक्य होत नाही. माझे मामा पोलिस खात्यांत हवालदार होते. त्यांच्यामुळे मला पोलिसांच्या घरांच्या प्रश्नांची पुरती जाण आहे. याचसाठी आपण कोल्हापूर परिक्षेत्राामधे आल्यावर सर्वप्रथम निर्भया पथकांबरोबर पोलिसांच्या घरांचा प्रश्न हाती घेतला होता.

 त्यानुसार परिक्षेत्रातील प्रत्येक जिल्हयामधे पोलिसांची नव्याने घरे होण्यासाठी आम्ही सरकारकडे प्रयत्नशील होतो. यातूनच पुढील दीड वर्षाच्या आसपास नव्याने घरे उभारली जाणार आहे. यामधे कोल्हापूरसाठी जवळपास 1250 ,सांगली जिल्हयासाठी 1848तर सोलापूरसाठी 400 आणि पंढरपूरसाठी 350 घरे नव्याने होणार आहेत.

  यामधे विशेष म्हणजे कोल्हापूर येथे स्वातंत्र्यानंतर पहील्यादांच घरे होणार आहेत. यापूर्वी कोल्हापूर येथे 1883 मधे घरे झाली होती. त्यानंतर पहील्यादांच कोल्हापूर येथे घरे होणार आहेत.

   परिक्षेत्रामधील पोलिसांच्या निवासासोबतच पंढरपूर येथेही वारीच्या बंदोबस्ताला आल्यावर पोलिसांच्या निवासांची मोठी तारांबळ उडते. अशावेळी येथे पोलिसांचे हक्कांचे एक निवासस्थान असावे. अशासाठी पंढरपूर येथेही एक पोलिस निवास बांधण्यात येणार असल्यांचेही त्यांनी यावेळी संकेत दिले आहेत.

  प्रत्यक्षात कोणताही पोलिस कर्मचारी अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात कर्तव्य बजावत असताना. ‘डयुटी अवर्स’ कधीच पाळत नाही. त्यामुळे आपसुकच कुंटुबाकडे पर्यायाने घरांकडे दुर्लक्ष होते. ज्या परिस्थितीमधे पोलिस कर्मचा-यांचे कुंटुब राहतात. त्या वसाहतीमधे सोयीसुविधा सोडाच. पण अत्यंत दयनीय अवस्थेत कुंटुब राहत आहे. त्याचा परिणात कोणत्याही पोलिस कर्मचारी , अधिकारी यांच्या कर्तव्यावर कधीच दिसून आला नाही. आज आता यांच पोलिस कर्मचा-यासाठी घरे बांधण्याचा निर्णय हा केवळ दिलासा देणारा नव्हे तर पोलिसांची कर्तव्ये , त्यांच्या कुंटुबियांचा पाठींबा यासारख्या मानसिक गोष्टीचा स्तर उंचावणारा आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Related posts: