|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पंढरीत जिल्हयांचे पोलिस उपमुख्यालय स्थापणार : विश्वास नांगरे पाटील

पंढरीत जिल्हयांचे पोलिस उपमुख्यालय स्थापणार : विश्वास नांगरे पाटील 

पंढरपूर / प्रतिनिधी

सोलापूर जिल्हयांचा आवाका हा मोठा आहे. यासाठी पंढरपूर येथे सध्या सहा.पोलिस अधिक्षक देण्यात आला आहे. भविष्यामधे अतिरिकत पोलिस अधिक्षक कार्यालय पंढरीत स्थापून जिल्हयांचे उपमुख्यालय देखिल येथे उभे करणार असल्यांची माहीती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.

कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील सध्या सोलापूर जिल्हा ग्रामीणच्या तपासणी साठी दौ-यावर आहेत. यांचाच एक  भाग म्हणून त्यांनी आज सुरूवातीला पंढरपूर शहर आणि तालुका पोलिस ठाण्यांची तपासणी केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी पोलिस अधिक्षक विरेंश प्रभू , अतिरिक्त पोलिस अधिक्षक मनिषा दुबुले , सहा. पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे आदि यावेळी उपस्थित होते.

यापूर्वी श्री नांगरे पाटील यांनी श्री विठठलांचे दर्शन घेतले. तसेच शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या निवासस्थानी त्यांचे पिता मुन्नागिर गोसावी यांची देखिल त्यांनी भेट घेतली. त्यानंतर शहर पोलिस स्थानकांत नव्याने उभारण्यात आलेल्या अभ्यागत कक्षांचे उदघाटन यावेळी त्यांच्याहस्ते झाले. दरम्यान पोलिस विभागांच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आले. यावेळी सदच्या पोलिस गार्डचे नेतृत्व करणारे जे. आर. कोरीशेटटी यांनी उत्कृष्ट नेतृत्व करीत मानवंदना दिल्याबददल अभ्यागत कक्षांचे उदघाटन करण्याचा मान नांगरे पाटील यांनी श्री कोरीशेटटी यांना दिला.

   याप्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले , सोलापूर आणि खास करून पंढरपूरच्या बाबात पोलिस यंत्रणा सक्षम करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. येथे तीर्थक्षेत्र असल्याने मोठया संख्येने भाविक येत असतात. त्यादृष्टीने येथील सुरक्षा कार्यन्वित करण्यासाठी येथे कायमचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक कार्यालय तसेच जिल्हयांचे सबहेडकॉर्टर म्हणजेच जिल्हा पोलिस उपमुख्यालय उभारण्यात येईल. जेणेकरून येथे कायमचे 200 ते 300 पोलिस कर्मचारी व अधिकारी कायमचे तैनात राहतील. यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

  शिवाय वारी कालावधीमधे येथे पोलिकसांच्या निवासांची अडचण आहे. यासाठी देखिल जागेंचा शोध आहे. जागा मिळाल्यावर येथे पोलिसाकरिंता स्वतंत्र निवासाची सोय करण्चयात येणार आहे. गतवर्षामधे निर्भया पथक आणि पोलिसांच्या निवासांचे दोन मोठे प्रश्न आम्ही मार्गी लावले आहेत. यामधे पंढरपूरला स्वतंत्र सहा.पोलिस अधिक्षक देखिल देण्यात आला असून यावर्षभरामधे येथील वाहतमुकीला धार्मिक पावित्र्य राखून नियोजन करण्यात येणार असल्यांचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

तसेच तीर्थक्षेत्र म्हणून येथील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी देखिल नियोजन करण्यात येणार आहे. यामधे येथील भुरटे चोर , तसेच अवैध धंदे यांच्याबाबतही याग्य निर्णय घेण्यात येणार आहेत. वाळू माफ्ढियांना यापुढे मोक्का आणि एमपीडीए च्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्यांचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यानंतर पोलिस महानिरिक्षक नांगरे पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्याला भेट दिली. यानंतर त्यांनी येथील स्वेरीज कॉलेजवर आयोजित कार्यक्रमांमधे त्यांनी नागरिकांशी आणि पोलिसांशी देखिल संवाद साधला. य्ािंनंतर त्यांनी मंगळवेढा येथे प्रयाण केले. य्sिंथून अक्कलकोट , माढा , माळशिरस आदि भागांतील पोलिस ठाण्यांची ते तपासणी करणार आहेत.

Related posts: