|Friday, October 18, 2019
You are here: Home » उद्योग » ड्रेजिंग कॉर्पोरेशनमधील सरकारी हिस्सा विक्रीस

ड्रेजिंग कॉर्पोरेशनमधील सरकारी हिस्सा विक्रीस 

नवी दिल्ली 

: ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधील 51 टक्के समभागांची विक्री करण्याचा सरकार विचार करत आहे. सरकारकडे कंपनीची 73.47 टक्के मालकी आहे. सरकारकडील 51 टक्के समभागांची किंमत 636 कोटी रुपये आहे. ही कंपनी बंदरांमध्ये ड्रेजिंगची सेवा पुरविते. या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात स्पर्धा असून कंपनीचा हिस्सा अजूनही मर्यादित प्रमाणात आहे. सरकार हिस्सा विक्री करणार असल्याचे समजताच कंपनीच्या समभागात सोमवारी 13.21 टक्क्यांनी वृद्धी झाली. सरकार रणनीतीच्या आधारे समभागांची विक्री करणार आहे.