|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » तासगाव निमणी खून बातमी

तासगाव निमणी खून बातमी 

प्रतिनिधी / तासगाव

तासगाव तालुक्यातील निमणी येथील 75 वर्षीय वृद्ध महिलेचा सोन्यांच्या दागिण्यांसाठी छातीवर जबर मारहाण करून त्यांचा खून करण्यात आला असून याप्रकरणी अज्ञात चोरटय़ाविरूद्ध तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी दिली.

तालुक्यातील निमणी येथील सौ. शालन शामराव सोमदे (वय 95) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. तर याप्रकरणी त्यांच्या सुनबाई सौ. संगिता मारूती सोमदे यांनी अज्ञात चोरटय़ाविरूद्ध फिर्याद दिली आहे.

यामध्ये म्हटले आहे की, नेहरूनगर रोडला निमणी गावच्या हद्दीत गट नं. 450 34 गुंठे क्षेत्र सासऱयांच्या नावावर आहे. त्यामध्ये सध्या उसाचे पिक आहे. सोमवारी सहा रोजी सासुबाई सौ. शालन या नेहमीप्रमाणे सकाळी साडेआठच्या दरम्यान शेतात वैरणीसाठी गेल्या व मी सकाळी 11 च्या सुमारास त्यांना जेवण घेऊन शेतात गेले दोघींनी वैरण काढले. त्यानंतर जेवणखाण केले मी त्यांना घरी चला म्हणाले व त्या उन्हात मला चालणे होत नाही, तू मला जा आपण दोघी संध्याकाळी मिळून घरी जाऊ असे म्हणाल्या. त्यामुळे मी 12 च्या दरम्यान वैरणीचा भारा घेऊन घरी आले.

घरी येतेवेळी सासुंच्या गळ्यात सुमारे अर्धा तोळा वजनाचे सोन्याचे मणीमंगळसुत्र रक्कत आठ हजार रूपये तसेच कानात दीड ग्रॅम वजनाचे दोन हजार रूपयांची कर्णफुले असल्याचे मी पाहिले होते. मी घरातील कामे करून पाच च्या दरम्यान आमच्या शेतात गेले तेथे सासूबाईंना नेहमीप्रमाणे काकू म्हणून हाक मारू लागले. परंतु, त्यांनी नेहमीप्रमाणे कोणताही प्रतिसाद दिला नाही.

मी उसाच्या सरीतून हाका मारत त्यांची नेहमी बसण्याच्या ठिकाणी चिक्कूच्या झाडाखाली पाहिले असता सासुबाई झोपलेल्या दिसल्या म्हणून त्यांच्याजवळ जाऊन हाका मारून त्यांना हलवून उठवण्याचा प्रयत्न करू लागले. पण, त्या कोणतीही हालचाल न करता निपचिप पडलेल्या दिसल्या तसेच त्यांच्या कानावर व तोंडातून रक्त आल्याचे दिसले तसेच त्यांचे कानात व गळ्यात असलेले दागिने दिसून आले नाहीत.

दरम्यान, मी बाजूच्या कुंभार वस्तीत जाऊन तेथील लोकांना बरोबर घेऊन सासूबाई पडलेल्या ठिकाणी आलो व त्यांना पुन्हा हालवून उठवण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे अंग थंड पडले होते व त्या मयत झाल्याचे आमची खात्री झाली. तेथील लोकांनी कुटुंबीयांना फोनवरून घटना सांगितली. याचवेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. संबंधित महिलेच्या अंगावर जखमेची कोणतीही खूण दिसून न आल्याने याप्रकरणी प्रारंभी अकस्मित मृत्यूची नोंद पोलिसात झाली होती. मात्र, सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथील शवविच्छेदनानंतर प्राप्त झालेल्या अहवालानुसार खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली शिंदे, पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील, स.पो.नि. धनाजी पिसाळ, उपनिरीक्षक प्रदीप चौधरी व पोलीस कर्मचाऱयांनी मंगळवारी पुन्हा घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

छातीवर जबर मारहाणीमुळे मृत्यू – मिलिंद पाटील

संबंधीत महिलेला सोन्या चांदीचे दागिने आपल्या कब्जात घेण्याच्या उद्देशाने अज्ञात चोरटय़ाने त्यांच्या छातीवर जबर मारहाण केली. या मारहाणीत सौ. शालन सोमदे यांच्या उजव्या बाजूच्या पाच व डाव्या बाजूच्या सहा बरगडय़ा मोडून फुफुसात घुसल्या होत्या. त्यामुळ तेथेच रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला असल्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी सांगितले.

Related posts: