|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अनिल देसाई यांच्यावर टांगती तलवार

अनिल देसाई यांच्यावर टांगती तलवार 

 प्रतिनिधी/ सातारा

अनिल देसाई हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना एक अभ्यासू जिल्हा परिषद सदस्य अशीच ओळख होती. मात्र, त्यांच्या काही केलेल्या घडामोडीही राष्ट्रवादीच्या जिल्हा नेत्यांच्या दृष्टीआड गेलेल्या नसल्याने आता त्यांच्यावर जिल्हा बँकेत टांगती तलवार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अध्यक्ष शिवेंद्रराजे हे निर्णय काय घेणार याकडे जिल्हावासियांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात पक्ष प्रवेश झाल्यानंतर काही दिवसापासून विरोधात वक्तव्य करण्यास सुरुवात केली होती. तसेच झेडपी निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात आघाडी काढली अन् स्पष्टच विरोध राष्ट्रवादीला विरोधात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे राष्ट्रवादी कडूनही त्यांना जिल्हा बँकेच्या कोअर कमिटीसह सर्वच कमिटय़ामधून काढून टाकले गेले. आता मात्र, नजर जिल्हा बँकेचे संचालक असलेले अनिल देसाई यांच्याकडे वळणार आहे.

अनिल देसाई यांनीही अध्यक्ष व सभापतींच्या राजीनाम्यावेळी काही सदस्यांना सोबत घेवून वेगळी फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. अगदी याची बैठक शासकीय विश्रामगृहात घेवून अध्यक्षपदासाठी अनेकजण रेसमध्ये असल्याचे त्यांनीच दाखवून दिले. त्यामध्ये त्यांचा हेतू असाच होता, माण तालुक्याला अध्यक्षपद मिळताना आपल्यालाही संधी मिळावी हा होता, अशी त्यावेळी चर्चा होती.

शिवेंद्रराजेंच्या भूमीकेकडे सर्वांचे लक्ष

 सध्या अनिल देसाई यांनी पक्ष बदलला आणि त्यांच्या जोरावर त्यांनी माणमध्ये कमळही फुलवले. त्यामुळे माण तालुक्यात राष्ट्रवादीचा एक मोहरा गेल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी राष्ट्रवादीकडून शोधाशोध सुरु आहे. यामध्ये जिल्हा बँकेत विविध कमिटय़ांवर अनिल देसाई यांचाही समावेश असून त्यांच्यावर आता टांगती तलवार आहे.  अध्यक्ष शिवेंद्रराजे हे काय निर्णय घेतील याकडे नजरा लागून राहिल्या आहेत.

Related posts: