|Monday, February 17, 2020
You are here: Home » Top News » खडसेंच्या अडचणीत वाढ ; महाराष्ट्र एसबी करणार चौकशी

खडसेंच्या अडचणीत वाढ ; महाराष्ट्र एसबी करणार चौकशी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

भोसरी येथील एमआयडीसीतील  जमीन खरेदी आरोपीप्रकरणी माजी महसूल मंत्री आणि भाजपचे नेते एकनाथ गाडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे कारण या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एसीबीकडे (लाचलुचपत प्रतिबंध विभागा) सोपविण्यात आला आहे.

पुण्यातील बंडगार्डन पोलिसांनी मात्र, एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे आणि गिरीश चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार दिला आहे. तक्रार अर्जवरील चौकशीनंतर कोणत्याही स्वरूपात दखलपात्र गुन्हा होत नाही, असे पोलिसांनी सांगितले होते. मात्र एकनाथ खडसे यांच्या विरोधात करण्यात तक्रार दाखल करणयस सकारला काय अडचण आहे, असा सवाल करत उच्च न्यायालयाने निर्णय घेण्यासाठी सरकारला शेवटची संधी दिली होती. खडसे यांच्याविरोधात निवृत न्यायामृर्ती दिनकर झोटिंग यांची समिती चौकशी करत आहे.

Related posts: