|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निंबाळकर,चौगुले यांची निवड

आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निंबाळकर,चौगुले यांची निवड 

कोल्हापूर

इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशनमार्फत दावणगिरी (कर्नाटक) येथे निवड चाचणीमध्ये 120 किलो वजनगटामध्ये शाहू ग्रुप, कागलचा खेळाडू अमित उदयसिंह निंबाळकर व अजिंक्य वसंत चौगुले यांची 83 किलो वजनगटामध्ये भारतीय संघामध्ये निवड झाली आहे. इंडोनेशिया येथे 1 ते 5 मे या कालावधीत होणाऱया आशियाई पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी कोल्हापूर येथील या दोघांचा भारतीय संघामध्ये समावेश केला आहे.

यापूर्वी अमित निंबाळकर याने सन 2010 मध्ये मंगोलीया येथे झालेल्या ज्यु, आशियाई पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये कास्यपदक व सन 2015 मध्ये हाँगकाँग येथे झालेल्या वरिष्ठ आशियाई पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये रौप्यपदक मिळवले आहे. तसेच अजिंक्य चौगुले याने सन 2016 ला गुंटूर (आंध्रप्रदेश) येथे अखिल भारतीय अंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये रौप्यपदक मिळवले आहे. या दोघांचे प्रशिक्षक सुरेश चेडे (मुंबई) हे असून, त्यांची भारतीय संघाचे प्रशिक्षकपदी निवड झली आहे. शाहू ग्रुप, कागलचे राजे समरजितसिंह घाटगे यांचे बहुमोल प्रोत्साहन मिळाले असून, राम सारंग, बिभिषण पाटील, संजय सरदेसाई यांचेही प्रोत्साहन त्यांना मिळाले आहे.