|Thursday, February 27, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » ब्राह्मोस बनले आणखीन घातक

ब्राह्मोस बनले आणखीन घातक 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताने पहिल्यांदाच 450 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करण्यास सक्षम नव्या ब्राह्मोस स्वनातीत क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 290 किलोमीटरवरून वाढवत 450 किलोमीटर करण्यात आली आहे. याचा वेग ध्वनीपेक्षा तिपटीने अधिक आहे. ब्राह्मोस भारताचेच नव्हे तर जगाचे सर्वात वेगवान स्वनातीत क्रूज क्षेपणास्त्र मानले जात आहे. या यशाने भारतीय लष्कर आणि नौदलाच्या सामर्थ्यात वाढ होईल. एमटीसीआरमध्ये सामील झाल्यानंतर भारताने 290 किलोमीटरपेक्षा अधिक मारक क्षमतेचे स्वनातीत क्रूज क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.

तर ब्राह्मोच्या यशानंतर पाकिस्तान आणि चीन बिथरला आहे. परंतु अजूनही या देशांकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. या क्षेपणास्त्राला भारत आणि रशियाचा संयुक्त उपक्रम ‘ब्राह्मोस एअरोस्पेस’ने तयार केले आहे. ब्राह्मोस एअरोस्पेसचे कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर मिश्र यांनी हे क्षेपणास्त्र 99.94 टक्के अचूकतेसह आपले लक्ष्य भेदू शकते असे म्हटले.

 जे देश एमटीसीआरचे सदस्य देश नाहीत, ते 290 किलोमीटरपेक्ष अधिक मारा करणारे क्षेपणास्त्र बनवू शकत नाहीत. या क्षेपणास्त्राच्या अधिक चाचण्यांची गरज भासणार नाही आणि नव्या क्षेपणास्त्रांना थेट लष्करात सामील केले जाईल.

सॉफ्टवेअरमध्ये बदल

क्षेपणास्त्राची मारक क्षमता वाढविण्यासाठी याच्या सॉफ्टवेअर आणि इंटरनल डायनेमिक्समध्ये बदल करण्यात आला. भारत आधीच याची मारकक्षमता वाढवू शकला असता. परंतु एमटीसीआरचा सदस्य नसल्याने याची क्षमता 290 किलोमीटरपेक्षा अधिक वाढविण्यात आली नव्हती.

Related posts: