|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सीआयएला ड्रोन हल्ल्याचा अधिकार

सीआयएला ड्रोन हल्ल्याचा अधिकार 

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा निर्णय : पाकच्या अडचणी वाढणार

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीआयएला दहशतवादी संघटनांविरोधात ड्रोन हल्ला करण्याचा अधिकार दिला आहे. हा निर्णय पाकिस्तानसाठी प्रभावी होऊ शकतो. याप्रकारे ओबामा प्रशासनाच्या धोरणांमध्ये बदल करण्यात आला, ज्यांतर्गत याप्रकारचा ड्रोन हल्ला करण्याचा अधिकार संरक्षण विभागाला दिला होता आणि सीआयए केवळ गुप्त माहिती जमा करण्यासाठी ड्रोनचा वापर करत असे.

व्हाइट हाउस आणि सीआयएने आतापर्यंत या वृत्तावर प्रतिक्रिया दिली नाही. ट्रम्प यांनी 21 जानेवारी रोजी सीआयए मुख्यालयाचा दौरा केल्यानंतर हा निर्णय घेण्यास अधिक वेळ लावला नाही असे द वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटले आहे. ट्रम्प प्रशासन लष्कराला पेंटागॉन किंवा व्हाइट हाउसकडून अनुमती न घेताच आपल्या निर्णयानुसार मोहिमेचे संचालन करण्याशी संबंधित आणखी अधिकार देणार आहे.

सीआयएला ड्रोन हल्ला करण्याचा अधिकार देण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकेच्या खळबळ निर्माण झाली आहे. वॉशिंग्टन डीसी स्थित एका थिंकटँकनुसार ओबामांद्वारे धोरणात बदल करणे आणि फक्त संरक्षण विभागाला ड्रोन हल्ल्याचा अधिकार देण्यापूर्वी सीआयएद्वारे सर्वाधिक ड्रोन हल्ले पाकिस्तानात करण्यात आले होते.

ड्रोन हल्ल्यात कमीतकमी 1904 जण मारले गेले होते आणि हा आकडा 3114 एवढा देखील असू शकतो असे तज्ञ पीटर बर्गन आणि डेव्हिड स्टेर्मन यांनी म्हटले होते. ओबामा प्रशासनाच्या अखेरच्या 8 महिन्यांदरम्यान अमेरिकेचे ड्रोन हल्ले बंद होते.