|Sunday, August 18, 2019
You are here: Home » Automobiles » कावासाकीकडून BS III इंजिनच्या बाइक्सवर सवलत

कावासाकीकडून BS III इंजिनच्या बाइक्सवर सवलत 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दुचाकी वाहन निर्माता कंपन्यांनी 1 एप्रिलपासून स्कूटर आणि बाइक्सच्या किंमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जपानची वाहन निर्माता कंपनी होंडा आणि कावासाकीने BS III असणाऱया आपल्या उपलब्ध मोटारसायकलींच्या किमती कमी केल्या आहेत.

ì®meHeÀ

होंडा CBR650F या वाहनाची किंमत 8 लाख 10 रुपये असून, या बाइकवर डिस्काऊंट देण्यात आले आहे. त्यामुळे ही बाइक 7 लाख 15 हजार रुपयांत ग्राहकांना मिळणार आहे. या बाइकमध्ये 648.72 सीसीचे क्विड कूल्डचे 4 सिलेंडर इंजिन देण्यात आले असून, 85.5 बीएचपीची पॉवर आणि 63 एनएमचा टार्क निर्माण करण्याची क्षमता या नव्या बाइकमध्ये असणार आहे. कावासाकी कंपनीने Z250 बाइकची किंमतीत 1 लाखांची कमी केली आहे. आता ही बाइक 3 लाख रुपयांत मिळणार आहे. याचबरोबर Ninja 650 च्या किंमतीत 1 लाख 50 हजार रुपयांची कमी केली आहे.