|Sunday, December 8, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » आता 2019 च्या निवडणुकीवर भाजपची नजर

आता 2019 च्या निवडणुकीवर भाजपची नजर 

 नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत गुरुवारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी 2019 मध्ये होणाऱया लोकसभा निवडणुकीसाठी व्यूहरचनेचा आराखडा तयार केला. बैठकीत उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप नेत्यांना तरुणाईला पक्षाशी जोडून त्यांच्यात स्थान बनवावे असा निर्देश दिला. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर 2019 मध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक मोठे आव्हान असल्याचे पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी म्हटले.

उत्तरप्रदेश समवेत 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येताच गुरुवारी पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीत विजयासाठी आभार प्रस्ताव संमत करत पुढील व्यूहरचनेचा आराखडा सादर करण्यात आला. पक्षाने दलितांपर्यंत पोहोच बनविण्याचे प्रयत्न जारी ठेवण्यावर भर दिला. दलितांनी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात भाजपला मत दिल्याचे मानले जात आहे.

14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीवेळी भाजप आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. पक्ष प्रत्येक पंचायत आणि वॉर्डमध्ये कार्यक्रम आयोजित करेल. याशिवाय 6 एप्रिल रोजी आपला स्थापना दिन व्यापक स्वरुपात साजरा करेल. ज्यात पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते ‘स्वच्छ भारत’ मोहिमेत भाग घेतील.

तरुणाईवर लक्ष केंद्रीत

बैठकीत मोदींनी पक्ष नेत्यांना एका आठवडय़ाच्या कार्यक्रमादरम्यान भीम ऍप आणि डिजिटल पेमेंट माध्यमाच्या वापराला वेग प्रदान करणे आणि लोकांमध्ये याच्या प्रति जागरुकता फैलावण्यास मदत करण्यास सांगितले. तरुणाईला केंद्र सरकारच्या लोककल्याण योजना तसेच सुशासनाचा ’अग्रदूत’ बनवावे. सध्या तरुणाई वृत्तपत्रे किंवा वृत्तवाहिन्यांवर निर्भर राहण्याऐवजी मोबाइल फोनचा अधिक वापर करतात. अशा स्थितीत त्यांच्यासोबत संपर्क बनविण्यासाठी या माध्यमाचा वापर करावा. 12 वीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांपासून संपर्क स्थापित करावा असे मोदींनी पक्षनेत्यांना सांगितले.

2019 साठी तयारी

अलिकडच्या निवडणुकांमध्ये पक्षाला मिळालेला विजय लोकांचा जातपात, परिवारवाद आणि भ्रष्टाचार विरोधात मतदान करण्याचा परिणाम होता. लोकांनी पंतप्रधान मोदींचे नेतृत्व आणि त्यांच्या जनकल्याणकारी योजना तसेच सुशासनाच्या बाजूने मतदान केले. 2019 च्या निवडणुकीसाठी पक्षाच्या नेत्यांनी आतापासूनच तयारी सुरू करावी. भाजपच्या विजयामुळे केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या योजना आणि नोटाबंदीच्या साहसी निर्णयावर जनतेचे शिक्कामोर्तब झाल्याचे शाह यांनी म्हटले.

Related posts: