|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ साताऱयात बाह्यरूग्ण सेवा ठेवली बंद

डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ साताऱयात बाह्यरूग्ण सेवा ठेवली बंद 

प्रतिनिधी/ सातारा

धुळे येथील डॉ. रोहन मोहूनकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने शहरातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी बाह्यरूग्ण सेवा बंद ठेवून जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना डॉक्टरांना संरक्षण देणारा कायदा त्वरित व्हावी, या मागणीचे निवेदन दिले.

येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉ. गदगकर हॉलमध्ये सर्व वैद्यकीय व्यावसायिक एकत्र जमले.  इंडियन मेडिकल असोसिएशनचे वैद्यकीय व्यावसायिक जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याशी चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. विकास पाटील, उपाध्यक्ष डॉ. निलेश थोरात, सेक्रेटरी डॉ. जीवन लाहोटी, खजिनदार डॉ. सूर्यकांत खंदारे यांनी चर्चा करून निवेदन दिले.

 या निवेदनाद्वारे आमच्या भावना शासनाला कळविण्याची विनंती केली. बंदमध्ये शहरातील सर्व डॉक्टर्स आपले वैद्यकीय व्यवसाय बंद ठेवून या निषेध आंदोलनात सहभागी झाले असलेतरी अत्यावश्यक सेवा मात्र सुरू ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱयांना सांगण्यात आले.

यावेळी माजी अध्यक्ष डॉ. अच्युत गोडबोले, डॉ. संजोग कदम, डॉ. सूर्यकांत खंदारे, डॉ. अनिल पाटील, डॉ. उमेश पाटील, डॉ. दिपक थोरात, डॉ. दीपक भालेघरे, डॉ. व्ही. एस. शेटे, डॉ. भास्कर यादव, डॉ. उल्हास आठवले, डॉ. अविनाश भोसले, डॉ. मिलींद शहा, जिल्हा डेंटल असोसिएशनचे डॉ. अनिकेत विभुते, डॉ. शेखर घोरपडे, डॉ. शरद जगताप, जनरल प्रॅक्टीसिशनर्स असोसिएशनचे डॉ. रमेश भट्टड, डॉ. प्रसन्न बाबर, डॉ. जयदीप चव्हाण, डॉ. दाऊद मोमीन, डॉ. देशमुख उपस्थित होते.

Related posts: