|Saturday, February 29, 2020
You are here: Home » Top News » भारताची कांगारूंवर 152 धावांची आघाडी

भारताची कांगारूंवर 152 धावांची आघाडी 

ऑनलाईन टीम /रांची :

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधील रांचीची तिसरी कसोडी चौथ्या दिवस अखेर मोठय़ा नाटय़म वळणावर उभी आहे. या कसोटीत टीम इंडियाने आपला पहिला डाव नऊ बाद 603 या धावसंख्येवर घोषित करून , 152 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर रवींद्र जाडेजाने डेव्हिड वार्नर आणि नॅथन लायनचा काटा काढून चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची दोन बाद 23 अशी बिकट अवस्था केली आहे.

भारताच्या हाताशी अजूनही 129 धावांची आघाडी असून, या कसोटीत टीम इंडियाला सनसनाट विजय मिळवण्याची संधी आहे. भारतीय संघाला रांची कसोटीवर वर्चस्व मिळवून दिले ते पुजारा आणि सहा यांनी सातव्या विकेटसाठी रचलेल्या 199धावांच्या भागीदारीने. चेतेश्वर पुजाराचे द्विशतक, रिद्धिमान साहाचे शतक आणि रवींद्र जाडेजाचे नाबाद अर्धशतक यांच्या जोरावर टीम इंडियाने रांची कसोटीत नऊ बाद 603 बाद धावसंख्येवर आपला पाहिला डाव घोषित केला होता. त्यामुळे भारताला पहिल्या डावात 152 धावांची आघाडी मिळाली होती. पुजाराने 21 चौकारासह 202 धावांची खेळी उभारली. रिद्धिमान साहाने 233 चेडूंत आठ चौकार आणि एक षटकारासह 117 धावांची खेळी केली. त्यांचे हे तिसरे कसोटी शतक होते. 

Related posts: