|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » क्रिडा » मियामी स्पर्धेतून मरेची माघार

मियामी स्पर्धेतून मरेची माघार 

वृत्तसंस्था/ मियामी

पुढील आठवडय़ात येथे सुरू होणाऱया मियामी मास्टर्स पुरूषांच्या एटीपी टेनिस स्पर्धेतून ब्रिटनचा टॉप सीडेड टेनिसपटू अँडी मरेने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. मरेच्या उजव्या कोपराला दुखापत झाली असून त्याला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

क्ले कोर्टवरील या स्पर्धेत आपण दुखापतीमुळे सहभागी होवू शकत नाही, असे मरेने स्पर्धा आयोजकांना कळविले आहे. गेल्या आठवडय़ात झालेल्या इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेच्या दुसऱया फेरीत कॅनडाच्या पोस्पिसीलने मरेला पराभवाचा धक्का दिला होता. मियामी स्पर्धेतील प्रमुख ड्रॉ मध्ये अँडी मरेच्या जागी अमेरिकेच्या टेलर फ्रिजला संधी मिळाली आहे.

Related posts: