|Monday, December 16, 2019
You are here: Home » leadingnews » ‘इनफ इज इनफ’ ; मुख्यमंत्र्यांचा डॉक्टरांना इशारा

‘इनफ इज इनफ’ ; मुख्यमंत्र्यांचा डॉक्टरांना इशारा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

डॉक्टरांवर हल्ला म्हणजे कर्मचाऱयांवर हल्ला अशाप्रकारे हल्ला करणे चुकीचे आहे. डॉक्टरांना एवढी आश्वासनं देऊनही डॉक्टर कामावर परतले नाहीत, हे अत्यंत चुकीचे आहे, किती संयम दाखवायचा ‘इनफ इज इनफ’, त्वरीत कामावर या अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपकरी डॉक्टरांना दिला.

विधानसभेत मुख्यमंत्री बोलत होते. डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी गेल्या पाच दिवसांपासून संप पुकारला. डॉक्टर संपात सहभागी झाल्याने रुग्णांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याविषयी मुख्यमंत्री विधानसभेत बोलत होते. ते म्हणाले, डॉक्टरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलू, त्यांच्या सुरक्षेसाठी सक्षम यंत्रणा उभी करु. मात्र, एवढी आश्वासनं देऊनही डॉक्टर कामावर परतले नाहीत, ही चुकीची गोष्ट आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. डॉक्टरांनी कामावर परत यावे, अन्यथा संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल.

Related posts: