|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » योगाच्या माध्यमाने बकरे नव्हे, तर वाघ बना

योगाच्या माध्यमाने बकरे नव्हे, तर वाघ बना 

प्रतिनिधी/ पणजी

“आपले आरोग्य हीच आपली सर्वात मोठी संपत्ती असते. आपले कुटुंब निरोगी राहीले की आपला समाज निरोगी बनतो. आपला समाज निरोगी राहीला की आपला देश निरोगी बनतो. त्यामुळे शरीराने व मनाने सशक्त व्हा. बळी नेहमी बकऱयाचाच दिला जातो, वाघाचा नव्हे. योगाच्या माध्यमाने नेहमी बकरे नव्हे, तर वाघ बना’’ असा संदेश केंद्रीय आयुष्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी येथील गोवा मनोरंजन सोसायटीच्या आवारात व आयनॉक्स परिसरामध्ये आयोजित केलेल्या गोवा योग महोत्सवाच्या व्याख्यानसत्रांच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलाताना केले. योग महोत्सवाच्या निमित्ताने महोत्सवाच्या समांतर चालणाऱया तीन दिवसीय व्याख्यानसत्रांचे उद्घाटन झाल्यानंतर दिवसभरात अनेक व्याख्याने व चर्चासत्रे मॅकीनेज He@uesme®³ee सभागृहात झाली.   

 

महोत्सवाच्या उपक्रमांचा एक भाग असलेल्या व्याख्यानसत्रांच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे या नात्याने नाईक यावेळी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. मिलिंद गोडबोले. डॉ. सुनील जोशी, डॉ. अशोक वर्ष्नी, डॉ. रमेश गौतम, डॉ. निनाद साठे, डॉ. श्याम भकरे आदी मान्यवर उपस्थित होते. या तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेमध्ये  मार्गदर्शन करताना नाईक पुढे म्हणाले की आज देशातला प्रत्येक नागरीक गेल्या दोन वर्षांमध्ये कुठल्याना कुठल्या प्रकारे माहिती घेत आहे. योगाच्या या यात्रेत प्रत्येक माणसाला जोडून घ्यावे, हा आयुष मंत्रालयाचा मानस आहे. योग म्हणजे जोडणे आहे. योगामध्ये माणसांना जोडण्याची ताकद आहे. बराच काळ आपल्या देशामध्ये असलेले योगाचे महत्व मधल्या काळात काहीसे कमी झाले होते. योगाकडे बरेच दुर्लक्ष झाले होते व त्यामुळे योगाचे महत्व मागे पडले होते. आपल्या देशातील काही महान व महनीय व्यक्तींनी योगाची परंपरा टिकवून ठेवली. भारत हा एकेकाळी सर्व क्षेत्रांमध्ये विश्वगुरू होता. आज सगळीकडे योग प्रशिक्षणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आज सर्वांनी योग या आरोग्यपूर्ण जीवनशैलीला स्वीकारून स्वतःचे जीवन आरोग्यपूर्ण अथवा निरोगी बनविणे ही काळाची गरज बनली आहे, असे मत नाईक यांनी बोलताना व्यक्त केले. सौ. चारूशीला देसाई यांनी उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन केले. त्यानंतर योग राष्ट्रीय परिषदेच्या पहिल्या दिवसाच्या निमित्ताने योग आणि जीवनशैली या विषयाशी निगडीत अनेक व्याख्याने व अभ्यासनिबंधांचे सादरीकरण झाले.

 

योग, जीवनशैली व आजार याविषयी व्याख्याने 

उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर या तीन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील योग परिषदेला प्रारंभ झाला. यामध्ये कालच्या दिवशी योग, जीवनशैली, आजार, विविध व्याधींना योगाच्या माध्यमाने दूर करणे, योगाच्या आधारे आरोग्यपूर्ण जीवनशैली कशी स्वीकारणे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. समीर महाजन यांनी “योग आणि अध्यात्म’’ या विषयावर योग आणि आध्यात्मिक बाजू याविषयी मार्गदर्शन केले. खारघर, मुंबई येथील आयुर्वेदीक महाविद्यालयाच्या प्राध्यापिका वैद्य श्रीमती प्रणाली दांडेकर यांनी “गर्भारपणामध्ये करण्यात येणारी योगासने व त्यामुळे होणारे फायदे’’ याविषयी मार्गदर्शन केले तसेच ‘गर्भिणी योग साधना’ या संकल्पनेविषयी विस्तृतपणे सांगितले. त्यानंतर श्री अम्बिका योग कुटीरतर्फे मधुमेह व योगाद्वारे चिकीत्सा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर भोजन व भोजनानंतरही काही सत्रे व चर्चात्मक कार्यक्रम झाले. आज रविवार व सोमवार असे दोन दिवस ही सत्रे व कार्यक्रम गोवा मनोरंजन सोसायटी व आयनॉक्सच्या समोर असलेल्या सभागृहात होणार आहेत.  

Related posts: