|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » माशेलात आज डॉ. रामचंद्र देखणे यांचा संतांचे लोककाव्यवर कार्यक्रम

माशेलात आज डॉ. रामचंद्र देखणे यांचा संतांचे लोककाव्यवर कार्यक्रम 

व्याख्याते आणि संत वाड;मयाचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचे आज रविवार दि. 26 रोजी संतांचे लोककाव्य : भारुडे व इतर गीते हा व्याख्यान तथा प्रात्यक्षिकांसह विशेष कार्यक्रम माशेल येथे होणार आहे.

माशेलच्या श्री देवकीकृष्ण सभागृहात गोवा मराठी अकादमीतर्फे संत श्री सोहिरोबानाथ आंबिये संत साहित्य संमेलनाच्या आजच्या दुसऱया दिवशीची सुरुवात डॉ. देखणे यांच्या या नव्या कार्यक्रमाने होईल. डॉ. देखणे हे संत साहित्याचे व लोक वाड;मयाचे गाढे अभ्यासक आहेत. उत्तम प्रवचनकार आणि बहुरुपी भारुडकार म्हणून डॉ. देखणे हे सुपरिचित आहेत. डॉ. देखणे यांची 45 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. संत साहित्य, चिंतन, लोकसाहित्य इत्यादी अनेक विषयांवर त्यांनी विपुल असे लेखन केलेले आहे. डॉ. देखणे यांचे संत साहित्य संमेलनानिमित्त पुणे येथून गोव्यात आगमन झाले आहे. रसाळ वाणीसाठी सुप्रसिद्ध असलेले देखणे यांनी आतापर्यंत अ. भा. मराठी साहित्य संमेलनात अनेकवेळा सहभागी होऊन भाषणे गाजविली. ‘बहुरुपी भारुड’ या विषयावर आतापर्यंत त्यांनी 2100 प्रयोग केलेले आहेत.

आज माशेलमध्ये सकाळी 9.30 वा. त्यांचा कार्यक्रम होणार असून त्यात डॉ. देखणे विविध विषयांवर सखोल माहिती देतील तसेच प्रात्यक्षिकेही करुन दाखविणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

Related posts: