|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » जमिनींचे बेकायदेशीर सेटलमेंट रोखायला हवे : सरदेसाई

जमिनींचे बेकायदेशीर सेटलमेंट रोखायला हवे : सरदेसाई 

प्रतिनिधी/ पणजी

राज्यातील जमिनींचे बेकायदेशीरपणे सेटलमेंट झोनमध्ये रुपांतर होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. गोव्याची लोकसंख्या किती आहे व सेटलमेंटची गरज किती आहे. हे पहाणे अत्यंत गरजेचे आहे. गोव्याचे गोंयकारपण राखायचे असेल तर यावर विचार करावा लागेल असे नगरनियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांनी सांगितले. प्रादेशिक आराखडा आणि बाह्यविकास आराखडे यावर पुढील आठवडय़ात आपण लक्ष देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नव्यानेच मंत्रिपद मिळविलेले व नगरनियोजन सारखे महत्त्वाचे खाते वाटय़ाला आलेले मंत्री विजय सरदेसाई सद्या आपल्या खात्याबाबत गांभीर्याने विचार करीत आहेत. प्रादेशिक आराखडा आणि बाह्यविकास आराखडे या माध्यमातून अनेक गोष्टी झालेल्या आहेत. त्यावर अगोदर लक्ष देऊन त्याबाबत चर्चा करणे आवश्यक आहे. घाईघडबडीने एकतर्फी निर्णय घेण्याऐवजी त्याबाबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी आपण चर्चा करणार आहे. प्रादेशिक आराखडा व बाह्यविकास आराखडे याबाबत त्यांच्या डोक्यात कोणत्या कल्पना आहेत तेही पहावे लागेल असेही मंत्री सरदेसाई यांनी सांगितले.

गोंय आणि गोंयकारपण राखडय़ासाठी हे सरकार सत्तेवर आलेले आहे. त्यामुळे या राज्याच्या विकासाला चालना देताना सगळ्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. गोव्याचे वेगळेपण जपायला हवे आणि राखायला हवे. त्यासाठी प्रादेशिक आराखडा आणि बाह्य  विकास आराखडे अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रत्यक्षात गुगलवरून काय दिसते व आराखडय़ात काय केले आहे हे पहावे लागेल. त्यानंतर पुढील गोष्टी करता येतील. प्रादेशिक आराखडय़ात कोणत्या नोंदी कशा आहेत व प्रत्यक्षात त्या कशा असायला हव्या यावरही विचार होणे गरजेचे आहे.

बेकायदेशीर सेटलमेंट होऊ नये

गोव्याची लोकसंख्या किती आहे. व त्यासाठी किती प्रमाणात जमिनी सेटलमेंट झोनमध्ये असायला हव्या याबाबत गांभीर्याने विचार व्हायला हवा. आवश्यकतेनुसार जमिनींचे रुपांतर व्हावे. हव्यासापोटी बेकायदेशीरपणे जमिनींचे सेटलमेंटमध्ये रुपांतर होऊ नये तसे झाले तर गोव्याच्या वेगळेपणाच्या दृष्टीने ते घातक ठरले. त्याचबरोबर त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे ते म्हणाले. नगरनियोजन हे अत्यंत महत्त्वाचे खाते आहे. व गोयकारपणाशी त्याचा अत्यंत महत्त्वाचे संबंध आहे. त्यामुळे गोव्याच्या वेगळेपणाचा विचार करून निर्णय घ्यावे लागतील. पुढील आठवडय़ात प्रादेशिक आराखडा कसा आहे हे पाहिले जाईल. त्याचबरोबर बाह्य विकास आराखडय़ावरही लक्ष दिले जाणार आहे. याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी काही दिवस लागतील. पण जेकाही केले जाईल ते गोयकारपण राखण्यासाठी व भवितव्य घडविण्यासाठी असेल असेही ते म्हणाले.

Related posts: