|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » बंधने झुगारत हॉकर्स पुन्हा फुटपाथवर

बंधने झुगारत हॉकर्स पुन्हा फुटपाथवर 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा नगरपालिकेने हॉकर्स विरुध्द उघडलेली अतिक्रमण मोहिम थंडावत चालल्याने व पाडवा असल्याने बाजारपेठेतील गर्दीचा फायदा व्यवसायाला होण्यासाठी सर्व बंधंने झुगारुन हॉकर्सने पाडव्यानिमित्त पूर्वपदावर बसून आपल्या व्यवसायांना नव्याने सुरुवात केली. हॉकर्स संघटनेने पाडव्याचा मुहुर्त साधुन सुरु केलेला व्यवसाय अतिक्रमण विरोधी मोहिम थांबवणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या आठवडय़ा भरापासून सातारा शहरातील रस्त्यावर बसणारे विक्रेते, रस्त्याच्या बाजुला जागा अतिक्रमीत करुन बेकायदेशीर दुकाने मोठय़ा प्रमाणात सुरु करण्यात आली होती. सातारा नगरपालिका अतिक्रमण विरोधी मोहिमेने हे सर्व दुकाने जमिनदोस्त करुन टाकली. व सर्वत्र अतिक्रमण हटवण्यात आले. तसेच बॉम्बे रेस्टॉरंट येथील पुलाखालील अतिक्रमणाने झालेला कोंडवाडा बुल्डोजरने काढतानाच खा. उदयनराजे भोसले यांनी हॉकर्स संघटनेच्या बाजुने उडी मारल्याने शेवटी नगरपालिकेला ही मोहिम थांबवावी लागली.

हॉकर्स संघटनेने ठोठावले उच्च न्यायालयाचे दरवाजे

नगरपालिका क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱया फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास अनुमती द्यावी. असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे असताना व राष्ट्रीय फेरीवाला धोरण 2009 मध्ये महाराष्ट्र शासनाने फेरीवाल्यासाठी धोरण जाहीर केले आहेत. तरी सातारा नगरपालिका सर्वेच्च न्यायालयाचा अवमान करुन हॉकर्स हटाव ही मोहिम बेकायदेशीर राबवत असल्याने हॉकर्स संघटनेने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

तसेच सातारा पालिकेने तातडीने फेरीवाला समिती स्थापन करावी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश व केंद्रीय कायद्यानुसार ज्या ठिकाणी आमचे व्यवसाय होते. त्याच ठिकाणी कायमस्वरुपी हॉकर्स झोन नेमून द्यावा त्याठिकाणी सर्व सोयीसुविधा द्याव्यात हॉकर्सना ओळखपत्रे, परवाने द्यावेत अशी मागणी हॉकर्स संघटनेकडुन करण्यात आली आहे.

Related posts: