|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » मी राष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत नाही ; भागवतांचे स्पष्टीकरण

मी राष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत नाही ; भागवतांचे स्पष्टीकरण 

ऑनलाईन टीम / नागपूर :

मी राष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत नाही, अशा बातम्यांकडे मनोरंजन वार्ता म्हणून पाहिले पाहिजे, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रपतीपदाच्या चर्चेत नसल्याचे स्पष्ट केले. मी संघाचा स्वयंसेवक आहे, यापुढेही राहणारच असेही ते म्हणाले.

ज्येष्ठ पशूवैद्य प्रतिष्ठानतर्फे एका आयोजित कार्यक्रमात भागवत बोलत होते. शिवसेनेने मोहन भागवत यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी पुढे केले होते. शिवसेनेने हे नाव घेतल्यानंतर भागवत यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत आले. यावर ते म्हणाले, प्रसारमाध्यमांमध्ये ज्या बातम्या येत आहेत त्या कधीच खऱया ठरणार नाहीत. संघात मोठे पद स्वीकारल्यानंतर आमच्यासाठी बाकीचे दार बंद असतात, असे त्यांनी निर्देशनास आणून दिले. माझे नाव राष्ट्रपतीपदासाठी आले तरी ते पद मी स्वीकारणार नाही, असेही ते म्हणाले.

दरम्यान, भागवत यांच्या विधानामुळे राष्ट्रपतीपदाच्या नावाच्या चर्चेच्या शक्यतेला पूर्णविराम मिळाला आहे.