|Monday, March 30, 2020
You are here: Home » Top News » गोहत्या केल्यास होणार जन्मठेप ; गुजरात सरकारचा निर्णय

गोहत्या केल्यास होणार जन्मठेप ; गुजरात सरकारचा निर्णय 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

गुजरातमध्ये जर कोणी आता गायींची हत्याप्रकरणात दोषी आढळल्यास तर त्या व्यक्तीस जन्मठेपाची शिक्षा सुनावण्यात येणार आहे. याबाबत गुजरात सरकारने विधानसभेत गाय संरक्षण कायद्यामध्ये बदल करण्याबाबतचे विधेयक मंजूर केले आहे. त्यामुळे गोवंश हत्येवर लगाम लागण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी सांगितले, गायींच्या होत असलेल्या हत्येच्या आरोपांविरोधात कडक कारवाई करण्यासाठी याच आठवडय़ात कायद्यामध्ये बदल केला जाणार आहे. गायींची किंवा गोवंश हत्या करणे हे बेकायदेशीर आहे. ते म्हणाले, गुजरातमध्ये पहिल्यापासूनच गोवंश कायदा आहे. तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी हा कायदा आणला. मात्र, हा कायदा आणखीन कडक करण्याची गरज आहे. गुजरात सरकारने यापूर्वी गोहत्या आणि गोमांसवरुन पूर्णपणे बंदी घातली होती.

Related posts: