|Sunday, October 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बारबंदीच्या आदेशाला फोंडय़ात संमिश्र प्रतिसाद

बारबंदीच्या आदेशाला फोंडय़ात संमिश्र प्रतिसाद 

प्रतिनिधी/ फोंडा

राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या मद्यविक्रिची दुकाने बंद करावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे त्यानुसार फोंडय़ातील बहुतेक मद्यविप्रेंत्यानी आपली दुकाने बंद ठेवून आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली. याला अपवाद काहि मद्य विक्रेत्यानी दुकाने चालू ठेवून सर्रास विक्रि करताना आढळली.

मद्यविक्रेत्याना या प्रकरणी विचारले असता संघटनेच्या पदाधिकाऱयाची बैठक मुख्यमंत्र्याशी होणार असून त्यानंतरच पुढील कृती ठरविण्यात येईल असे सांगितले. सिक्किम व मेघालय या छोटय़ा राज्यांना यातून सुट मिळालेली आहे. गोव्यालाही याच धर्तीवर सुट मिळू शकते अशी अपेक्षा बाळगून हिरमुसलेले मद्यविक्रेते आहेत.

या व्यवसायाच्या आधारावर विक्रेत्यांनी 20-30 लाखाची कर्जे काढल्याची माहिती मद्यविक्रेते शैलेश नाईक यानी दिली. परिस्थिती अशीच राहिल्यास कर्जाचा डोंगर वाढून हतबल होण्यावाचून पर्याय राहणार नसल्याची खंत यावेळी विक्रेत्यांनी मांडली.

  दरम्यान काहि बारवाल्यानी नामफलकातील ‘बार’ हा शब्द गाळून रेस्टारेंट या फलकासह बारबंद पण जेवणाची सोय पुरविण्यात येत होती. तसेच वरचा बाजार परिसरातील होलसेल मद्यविक्रेते सर्रास विक्रि करताना आढळले. त्यांना विचारणा केली असता आम्ही कायदेशीर असल्याचे सांगण्यात आले. एकूणच मद्यविक्रेत्यांनी या बारबंदीच्या आदेशाला संमिश्र प्रतिसाद दिला.