|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » तामिळनाडूच्या दुष्काळग्रस्त शेतकऱयांना मिळाला दिलासा

तामिळनाडूच्या दुष्काळग्रस्त शेतकऱयांना मिळाला दिलासा 

चेन्नई :

 दुष्काळप्रभावित भागांमधील शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी मद्रास उच्च न्यायालयाने मंगळवारी तामिळनाडूच्या सरकारला निर्देश दिला आहे. जवळपास एक महिन्यापासून तामिळनाडूचे शेतकरी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे निदर्शने करत असून त्यांच्या समर्थनार्थ भारतीय किसान युनियन देखील उतरले आहे. शेतकऱयांच्या स्थितीकडे सरकार डोळेझाक करत असल्याचा आरोप भारतीय किसान युनियनचे बलवीर सिंग राजेवाल यांनी म्हटले. निदर्शने करणाऱया शेतकऱयांनी लक्ष वेधून घेण्यासाठी कधी अर्धनग्न अवस्थेत तर कधी मेलेले साप जीभेवर ठेवून आंदोलन केले, कर्जाच्या बोज्यामुळे शेतकरी मरत असल्याचा संदेश याद्वारे केंद्रापर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. निदर्शक शेतकरी तामिळनाडूसाठी केंद्राकडून 40 हजार कोटी रुपयांचे दुष्काळनिवारण पॅकेज, कर्जमाफी आणि इतर दिलासाजनक निर्णयांची मागणी करत आहेत.

 

Related posts: