|Sunday, November 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फोंडय़ात 8 रोजी कव्वाली

फोंडय़ात 8 रोजी कव्वाली 

प्रतिनिधी/ फोंडा

जुने बसस्थानक सदर फोंडा येथील हजरत अश्रफ शाह काद्री रेहमतुल्ला ही अलाही दर्ग्याच्या ऊरूस शरीफ उत्सवानिमित्त शनिवार 8 एप्रिल रोजी रात्री 10 वा. कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशमधील आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुप्रसिद्ध टीव्ही व रेडिओ गायक युसूफ मलिक साब्री कव्वाल आणि मुंबई येथील टीव्ही कलाकार झेबा बानो यांच्यात कव्वालीचा मुकाबला होणार आहे. शुक्रवार 7 एप्रिल रोजी सायं. 7.30 वा. खुरान खानी तर रात्री 10 वा. संदलचा कार्यक्रम होणार आहे. मागील 60 वर्षाहून अधिक काळापासून फोंडय़ातील या दर्ग्यात ऊरूस निमित्त कव्वालीचा कार्यक्रम आयोजित केला जातो. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुप्रसिद्ध कलाकारांनी आजवर याठिकाणी कव्वाली सादर केली आहे. दरवर्षी प्रेक्षकांचा त्याला भरघोस प्रतिसाद लाभत असून यंदाही कव्वालीच्या या कार्यक्रमाला विविध भागातून श्रोते मोठय़ा संख्येने उपस्थित राहतील, अशी माहिती दर्गा समितीच्या पदाधिकाऱयांनी पत्रकार परिषदेत दिली. दर्गा समितीचे अध्यक्ष मूल्लाम शेख अब्बास, सरचिटणीस रियाझ मुल्ला, उपाध्यक्ष सय्यद हमीद व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts: