|Sunday, November 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कला, संस्कृती मंत्र्यांचा शोकसंदेश

कला, संस्कृती मंत्र्यांचा शोकसंदेश 

प्रतिनिधी/ पणजी

किशोरीताईंनी स्वरांच्या माध्यमातून भावविश्व यथार्थपणे पेश करीत गोमंतभूमीचे नांव सातासमुद्रापार पोचविले. त्यांच्या जाण्याने आपले संपूर्ण जीवनच संगीताला वाहिलेला एक प्रभावी व व्रतस्थ साधक हरपला असून हिंदुस्थानी अभिजात संगीताची मोठी हानी झाली आहे. असे गोव्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

जयपूर अत्रोली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका म्हणून त्यांचा लौकिक होता. ख्याल, ठुमरी, भजन व गायनात किशोरीताईंनी आपल्या शैलीची मुद्रा उमटवली. कठोर तपश्चर्या, सराव आणि अंगभूत प्रतिभा यामुळे त्यांचे गाणे कसदार झाले. संगीत नाटक अकादमी, पद्मभूषण, संगीत सम्राज्ञी, पद्मविभूषण, संगीत संशोधन अकादमी आदी विविध पुरस्कारांनी सन्मानीत किशोरीताई केवळ आपल्या गोव्याच्याच नव्हेतर संपूर्ण भारतभूमीचा संगीत श्वास होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून आपल्याला जबर धक्का बसल्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

Related posts: