|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » ठाण्यातील मानपाडा भागातल्या पाच गोडाऊनला आग

ठाण्यातील मानपाडा भागातल्या पाच गोडाऊनला आग 

ऑनलाईन टीम / ठाणे  :

ठाण्यातील मानपाडा भागातील पाच गोडाउनला सकाळी सहा वाजण्याच्या सुमाराश भीषण आग लागली. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते आहे.

सकाळी सहाच्या सुमारास मानापाडा भागातील एका गोडाऊनला आग लागली. ही पाचही गोडाऊन एकमेकाला लागून असल्याने आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामन दलाच्या तीन गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तसेच तीन टँकरही आग विझवण्यासाठी मागवण्यात आले होते.