|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आयटकची पणजीत धरणे

आयटकची पणजीत धरणे 

प्रतिनिधी/ पणजी

 गुरगाव हरयाणा येथील मारुती सुझुकी कंपनीने कामगारांवर अन्याय करुन त्यांना निलंबीत केल्याने त्याच निषेध म्हणून काल पणजी क्रांती सर्कलकडे आयटक तर्फे निदर्शने करण्यात आली. देशात खासगी कंपन्यांकडून होणाऱया कामगारांच्या अन्यायावर सरकारने लक्ष घालून त्यांना सरक्षा पुरवावी अशी मागणी करण्यात आली आहे.

गुरगाव येथील मारुती सुझूकी कंपनीमध्ये काम करणाऱया कामगारांनी युनियन केल्याने अनेक कामागारांना निलंबीत तसेच काही जणांना जेलमध्ये पाठवण्यात आले आहे.  स् त्यामुळे या कामगारांवर उपासमारीच पाळी आली आहे. कंपनीने आपल्या पैशाच्या जोरावर या कामगारांवर अन्याय करायला सुरुवात केली आहे.  हा या कामगारांवर एक प्रकारे होणारा अत्याचार आहे. कामगार आपल्या हक्कासाठी आवाज करता येत नाही त्यांचा आवाज दाबला जातो. केंद्र तसेच राज्य सरकारने कागारांना सुरक्षा पुरविली पाहीजे त्यांना कामाची सुरक्षा पुरविली पाहीजे. या सर्व कागमारांना पुन्हा कंपनीने सेवेत रुजू करावे. अन्यथा आयटकतर्फे देशभर निदर्शने केली जाणार आहे., याविषयी रविवार दि. 9 रोजी मिनिझिस ब्रागांझामध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे आयटकचे सचिव ऍड. ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी सांगितले.

 आयटकच्या सुमारे शेकडो कार्यकर्त्यानी काल पणजी क्रांती मैदानासमोर निशर्दने करुन या कामगारांसाठी न्याय मागितला. तसेच अशा प्राकरे कामगारांवर अन्याय सहन करुन घेतले जाणार नाही असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी आयटकचे ऍड. राजू मंगेशकर, ऍड. सुहास नाईक व अन्य कामगार उपस्थित होते.

Related posts: