|Sunday, November 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गाडेधारकांची कायदेशीर कागदोपत्रांची तपासणी

गाडेधारकांची कायदेशीर कागदोपत्रांची तपासणी 

प्रतिनिधी/ पणजी

 उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पणजी शहरातील बेकायदेशीर गाडे हटविण्याचा आदेश मनापाला दिल्याने मनपाने पणजीत सर्व गाडे हटवून त्यांची तपासणी सुरु केली आहे. काल पणजीतील सर्व गाडेधारकांचे कायदेशीर कागदोपत्रे तपासण्यात आली. शनिवारी 8 रोजी कलाअकादमीच्या मांडवीतीरानजीक सर्व गाडे धारकांनी आपल्या गाडय़ांसमवेत उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी मनपाच्या मार्केट समितीने केले आहे.

 पणजी शहरात भेलपूरी तसेच कोल्ड ड्रिंक वडापावाचे अनेक गाडे आहेत. हे गाडे दिवस रात्र एकाच ठिकाणी असतात.  फिरते गाडे असूनही रात्रीचे हे गाडे त्याच ठिकाणी असतात. तसेच अनेक बेकायदेशीर गाडे पणजी शहरात आहेत. उच्च न्यालयाच्या आदेशानूसार या गाडय़ांची पाहणी मनपाने सुरु केली आहे. शहरात एकुण 72 गाडे कायदेशीर आहेत जर यात बेकायदेशीर आढळले ते बंद केले जाणार आहे. तसेच सर्व गाडे आता कायदेशीर चालणार असून मालकांना हे गाडे रात्रीच्या वेळा rएकाच ठिकाणी न ठेवता घरी घेऊन जावे लागणार आहे. तसेच त्या गाडय़ावर आता मनपाची नजर असणार आहे, असे मार्केट समितीचे अध्यक्ष उदय मडकईकर यांनी सांगितले.

 काल मनपामध्ये सर्व गाडे धारकांची कायदेशीर कागदपत्रे तपासण्यात आली. यावेळी सर्व गाडेधारक उपस्थित होते. शनिवारी आपल्या गाडय़ासहीत या गाडेमालकांना हजर राहण्याचे आवाहन मार्केट समितीने केले आहे. यावेळी समितीचे सदस्य नगरसेवक दिनेश साळगांवकर, विठ्ठल चोपडेकर, शुभदा शिरगांवकर, मनिषा मणेरकर, मनपाचे निरिक्षक व उपआयुक्त उपस्थित होते.

Related posts: