|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » न्या. डेस्मंड डिकॉश्ता आज सेवानिवृत्त

न्या. डेस्मंड डिकॉश्ता आज सेवानिवृत्त 

प्रतिनिधी /मडगाव :

न्यायसंस्थेतील 25 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर एक मनमिळावू व तितकेच शिस्तप्रिय म्हणून ख्याती असलेले दक्षिण गोव्याचे मुख्य सत्र न्यायाधीश डेस्मंड डिकाश्ता आज 7 एप्रिल रोजी सेवेतून निवृत्त होत आहेत.

कायद्याची पदवी मिळविल्यानंतर न्या. डिकॉश्ता यांनी ज्येष्ठ वकील मारियो आल्मैदा यांच्याबरोबर तसेच ऍड. आनाक्लेत व्हिएगश यांच्याबरोबर त्यांनी काही काळ काम केल्यानंतर 1992 साली त्यांनी न्यायसंस्थेत प्रवेश केला.

प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, उत्तर गोव्याचे सत्र न्यायाधीश, खास न्यायालयाचे न्यायाधीश, दक्षिण गोव्याचे सत्र न्यायाधीश या पदावर काम करता – करता 25 वर्षाचा कालावधी लोटला. आज 7 एप्रिल रोजी ते सेवेतून निवृत्त होत आहेत.