|Sunday, September 22, 2019
You are here: Home » उद्योग » देशात 1 जानेवारीपासून आर्थिक वर्षाला प्रारंभ ?

देशात 1 जानेवारीपासून आर्थिक वर्षाला प्रारंभ ? 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारतात आर्थिक वर्षाला 1 एप्रिलपासून प्रारंभ होतो. 1 जानेवारीपासून आर्थिक वर्षाला सुरुवात करता येण्यासंदर्भात सरकारकडून समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने सरकारकडे अहवाल सादर केला असून सरकार लवकर निर्णय घेईल असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले.

समितीने अहवाल सादर केला असून त्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल. 1 जानेवारीपासून आर्थिक वर्षाला प्रारंभ करण्यात आल्यानंतर त्याचे अर्थव्यवस्थेवर कोणते परिणाम होतील याचाही विचार करण्यात आला. 1 जानेवारीपासून आर्थिक वर्ष सुरू करण्यासाठी समितीकडून हिरवा कंदील दाखविण्यात आला. त्याच्या अंमलबजावणीसंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

भारतातील अर्थव्यवस्था अजूनही गुंतागुंतीची आहे. 1 जानेवारीपासून आर्थिक वर्षाला प्रारंभ करण्यासाठी केंद, राज्ये आणि स्थानिक संस्थांचीही मते विचारात घ्यावी लागणार आहेत. ठोस निर्णय घेण्यापूर्वी तिन्ही पातळीवरील मतांचा विचार करण्यात येईल. भारतातील आर्थिक प्रणाली ही ब्रिटिशांनी सुरू केलेली आहे. अनेक देशात आर्थिक वर्षाची सुरुवात जानेवारी अथवा जून महिन्यापासून करण्यात येते असे अर्थमंत्र्यांनी म्हटले.