|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » राजकारण्यांना पाच वर्षांत रिटायरमेंट मिळते : मुख्यमंत्री

राजकारण्यांना पाच वर्षांत रिटायरमेंट मिळते : मुख्यमंत्री 

ऑनलाईन टीम / भिवंडी :

सरकारी सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱयांना सेवानिवृत्तीपर्यंत एकाच जागी राहता येते, मात्र आम्हा राजकारण्यांना पाच वर्षांतच रिटायरमेंट मिळते, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सरकारी अधिकाऱयाला लगावला.

नाशिक महामार्गावरील माणकोली नाक्यावरील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, अधिकाऱयांना शासनाच्या सेवेत आल्यानंतर निवृत्तीपर्यंत एकाच जागी राहता येते. मात्र, आम्हाला फक्त पाच वर्षच काम करावे लागते. काम व्यवस्थित न झाल्यास लगेच रिटायरमेंट मिळते. त्यामुळे आम्हाला काम भराभर करावी लागतात. तसेच त्यांनी कोणतेही सरकारी काम करण्यासाठी अधिकाऱयांची साथ गरजेची असते असेही सांगितले. नाशिक महामार्गावरील माणकोली नाक्याजवळचा उड्डाणपूल एमएमआरडीएने अजूनही याचे भरपूर कामं होणार आहेत. त्यासाठी अधिकाऱयांची साथ गरजेची असल्याचेही ते म्हणाले.