|Sunday, September 22, 2019
You are here: Home » Top News » शेतकऱयांच्या सरसकट कर्जमाफीला आमचा विरोध : एमआयएम

शेतकऱयांच्या सरसकट कर्जमाफीला आमचा विरोध : एमआयएम 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

शेतकऱयांच्या सरसकट कर्जमाफीला आमचा विरोध आहे. सरसकट कर्जमाफीने धनदांडग्या शेतकऱयांचा फायदा होतो, त्यामुळे आमचा शेतकऱयांच्या सरसकट कर्जमाफीला विरोध असल्याची भूमिका एमआयएमने घेतली.

औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी ही माहिती दिली. शेतकऱयांना सरसकट कर्जमाफी मिळण्यावर आमचा विरोध आहे. त्यामुळे आम्ही विरोधी पक्षांच्या संघर्षयात्रेत सहभागी झालो नाही, असे जलील म्हणाले. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांनी कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले. भट्टाचार्य यांनी शेतकऱयांच्या कर्जमाफीवरुन जे वक्तव्य केले ते योग्य असल्याचेही ते म्हणाले.