|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जीवरक्षक पथकाने जोतिबा डोंगरावर बजावली सेवा

जीवरक्षक पथकाने जोतिबा डोंगरावर बजावली सेवा 

प्रतिनिधी / कोल्हापूर

जोतिबा यात्रेत भाविकांच्या गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर भाविकांना त्वरित मदत मिळण्यासाठी जीवरक्षक दिनकर कांबळे यांच्या जीवरक्षक पथकाने जोतिबा डोंगरावर सेवा बजावली. दुपारी गायमुख परिसरात लागलेली आग फायर फायटरच्या सहायाने आटोक्यात आणली.

सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांबळे हे रेस्क्यू एक्सपर्ट असून आतापर्यंत त्यांनी अनेकांची सुटका केली आहे. प्राणी आणि पक्ष्यानांही त्यांनी जीवदान दिले आहे. पाण्यातील मृतदेह काढण्यात ते एक्सपर्ट असून खोल पाण्यातील तसेच दरीतील शेकडो मृतदेह त्यांनी बाहेर काढले आहेत. लोकांना मदत करण्यासाठी कांबळे यांनी पथक तयार केले असून या पथकात 40 तरुणांचा समावेश आहे. सोमवारी या पथकाने जोतिबा डोंगरावर सेवा बजावली. वारणा परिसरात 20 आणि कोल्हापूर – जोतिबा मार्गावर 20 जणांचे पथक कार्यरत होते. दुपारी अचानक गायमुख परिसरात वाळलेल्या गवताला आग लागली. बघता बघता आगीने सुमारे अडीच ते तीन एकरात वणवा घेतला. या आगीने भाविकांची धावपळ उडाली. याचवेळी जीवरक्षक पथकातील तरुणांनी आगीवर फायर फायटरचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. यात्रेतील भाविकही आग विझवण्यासाठी धावले. यावेळी वारणा सहकारी साखर कारखान्याची अग्निशमन दलाचा बंब दाखल झाला. या बंबाच्या सहायाने आगीवर नियंत्रण नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले. वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

सकाळी प्रेस क्लबच्या कार्यालयासमोरुन हे पथक डोंगरावर रवाना झाले. प्रेस क्लबचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी या पथकाला हिरवा झेंडा दाखवत शुभेच्छा दिल्या. यावेळी फायर फायटरचे वसंत घाटगे, तरुण भारतचे प्रतिनिधी बाळासाहेब उबाळे,सुरेश चेचर, संतोष पाटील,स्वप्नील पाटील, दिपक सावेकर, वैभव बंगडे, अक्षय पाटील, धनाजु पाटील, सुनिल शिर्के उपस्थित होते.