|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » गोव्यात लेट नाईट पार्टीवर पर्रिकरांची कुऱ्हाड

गोव्यात लेट नाईट पार्टीवर पर्रिकरांची कुऱ्हाड 

ऑनलाईन टीम / पणजी :

संरक्षणमंत्रिपदाचा राजीनामा देऊन गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले मनोहर पर्रिकर यांनी धाडसी निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. पर्रिकर यांनी आता थेट लेट नाईट पार्टीवरच कुऱहाड चालवली आहे. कायदा व सुव्यवस्था अबधित राहण्यासाठी गोव्यात रात्री 10च्या पुढे पार्टी करण्यास कायद्याने बंदी असल्याची माहिती पर्रिकर यांनी माध्यामांना दिली.

भाजपचे नवे सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळातील काहा सदस्यांनी लेट नाईट पार्टीवर बंदीची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर पर्रिकरांनी हा निर्णय घेतला आहे. यासंबंधी कुठला वादही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पर्रिकर मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री विनोद पालियेकर यांनी गोव्यातील लेट नाईट आणि रेव्ह पार्टीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. पालिसांच्या सहकार्यानेच राज्यातील समुद्रकिनारपट्टीवर मोठय़ाप्रमाणात अमली पदार्थाची विक्री होते, असा गंभीर आरोप त्यांनी केली.