|Thursday, November 14, 2019
You are here: Home » leadingnews » कुलभूषण जाधव यांचा खटला लढला तर कारवाई ; वकिलांना धमकी

कुलभूषण जाधव यांचा खटला लढला तर कारवाई ; वकिलांना धमकी 

ऑनलाईन  टीम / नवी दिल्ली  : 

भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचा खटला जो कोणी वकील लढेल त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल असं लाहोर उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने म्हटलं आहे. लाहोर उच्च न्यायालय बार असोसिएशनचे सचिव जनरल आमेर सईद रान यांनी शुक्रवारी एका बैठकीनंतर ही माहिती दिली. बार असोसिएशनने पाकिस्तान सरकारला कोणत्याही परदेशी ताकदीसमोर न झुकण्याचं आवाहन केलं आहे. 
”जाधव हे भारतीय नागरिक असल्याचं भारताने मान्य केलं असून त्यांना सोडवण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणण्याचा प्रय़त्न करत आहे. पाकिस्तानी नागरिकांच्या जीवाशी खेळणा-या गुप्तहेराला वाचवलं जाऊ नये, सरकारने त्याला फाशी द्यावी” अशी मागणी सईद यांनी केली. 
 
दरम्यान, इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्त गौतम बंबावले पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव तहमीना जनजुआ यांच्यासोबत जाधव प्रकरणावर भेट घेणार असल्याचं वृत्त आहे. या प्रकरणी गेल्या वर्षी पाकिस्तानने भारताकडून करण्यात आलेल्या 13 अपील फेटाळल्या होत्या.  

Related posts: