|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कलाकारांना साधनसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संचालनालय प्रयत्नशील राहणार

कलाकारांना साधनसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संचालनालय प्रयत्नशील राहणार 

0414TR (7)प्रतिनिधी / पणजी

“एखाद्या व्यक्तीमध्ये आधीपासून कला असते. पण त्याला व्यासपीठ मिळणे आवश्यक असते. माणसांमधली कला समृध्द करणे आवश्यक असते. तिला पुढे नेणे आवश्यक असते. राज्यातील कलाकारांना साधनसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे कला व संस्कृती संचालनालय नेहमी प्रयत्नशील राहणार आहे’’ असे प्रतिपादन कला व ंसंस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी कला अकादमी येथे बोलताना केले. कला अकादमीच्या कला दालनामध्ये गोमंतकीय चित्रकारांच्या ‘आर्ट दे गोवा’ या कलाप्रदर्शनाचे उद्घाटन कला व संस्कृती मंत्र्यांच्या हस्ते काल शुक्रवारी संध्याकाळी 4.30 च्या दरम्यान झाले. यावेळी कलाकार, त्यांचे मित्र व हितचिंतक उपस्थित होते.

उद्घाटन सोहळ्याला गावडे यांच्यासह चित्रकार स्तंभलेखक नागेश राव सरदेसाई आणि चित्रकार शिवाजी सावंत व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना चित्रकार सावंत म्हणाले की राज्यातील कला विषयामध्ये पदवी उत्तीर्ण केलेल्या चित्रकलेच्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण घेण्यास वाव नसतो. गोवा कला महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर शिक्षण मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणी होत असल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यामध्ये कलेवर आधारीत आर्ट स्टुडियो असणेही आवश्यक असल्याचे सावंत म्हणाले. नागेश राव सरदेसाई म्हणाले की केवळ कलेतील पदवी शिक्षण मिळालेला कलाकारच केवळ कलाकार असतो असे नाही, तर शास्त्रोक्त शिक्षण न घेतलेला, पण चित्रकलेची किंवा इतर कलेची प्रतिभा असलेलीही व्यक्ती चित्रकार किंवा कलाकार असू शकते. प्रदर्शनात सहभागी चित्रकारांना नागेश राव सरदेसाई यांनी शुभेच्छा दिल्या.

Related posts: