|Saturday, October 19, 2019
You are here: Home » Automobiles » BSIV इंजिनसह Hero Pleasure लाँच

BSIV इंजिनसह Hero Pleasure लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारताची प्रसिद्ध दुचाकी वाहन निर्माता कंपनी Hero ने खास आपल्या ग्राहकांसाठी आपली BSIV एमिशन इंजिनची नवी प्लेजर नव्या फिचर्स आणि नव्या कलरसह लाँच केली आहे. या नव्या स्कूटरमध्ये ग्राफिक्ससह जास्त कलरफुल अशी बनवण्यात आली आहे.

BS IV इंजिन असणारी ही नवी प्लेजरमध्ये 3 डय़ुअल टोन आणि 4 टोन सिंगल टोन कलर शेडमध्ये उपलब्ध करण्यात आली असून, याच्या समोरच्या स्टोरेज कंपार्टमेंटमध्ये चार्जिंग पॉइंट देण्यात आलेला आहे. याचबरोबर या सीटच्या आत बूट लाइटही देण्यात आली आहे. सेफ्टीच्या विषयाच्या दृष्टीकोनातून पाहता इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टिम देण्यात आले आहे. साइड स्टँड इंडिकेटर्ससह कंपनीने या नव्या वाहनामध्ये 6 स्पोक अलॉय व्हिल्स् देण्यात आले आहे. 102 cc सीसीचे इंजिन असलेल्या स्कूटरमध्ये 7PS पॉवर आणि 8.1Nm चा टार्क निर्माण करण्याची क्षमता असणार आहे. या वाहनाचा अधिकतम स्पीड 77 km/h असणार आहे.