|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेतील अव्वल प्रियांका व साईश यांचा गौरव

विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेतील अव्वल प्रियांका व साईश यांचा गौरव 

प्रतिनिधी/ फोंडा

विद्यार्थी विज्ञान मंथन अंतर्गत विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱया प्रियांका शेणॉय व दुसरा क्रमांक मिळविणाऱया साईश नाईक या फर्मागुडी येथील जीव्हीएम श्रीमती नेली आगियार उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांच्याहस्ते नुकताच गौरव करण्यात आला.

दिल्ली येथे 27 व 28 मे रोजी होणाऱया राष्ट्रीय पातळीवरील विद्यार्थी विज्ञान मंथनच्या शिबिरासाठी प्रियांका शेणॉय व साईश नाईकची निवड झाली आहे.

दोनापावल येथील इंटरनॅशनल सेंटर गोवा येथे झालेल्या कार्यक्रमात डॉ. अनिल काकोडकर यांच्याहस्ते प्रियांका शेणॉय व साईश नाईक यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी परीक्षा आयोजन समितीचे राष्ट्रीय सचिव जयंत सहस्त्रबुद्धे व प्रा. सुहास गोडसे हे उपस्थित होते.

विज्ञान भारतीतर्फे विद्यार्थी विज्ञान मंथन हा राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत इयत्ता 6 वी ते 11 वीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची आवड निर्माण करून शिक्षण देणे, विज्ञान लोकप्रिय करणे तसेच गुणवंत विद्यार्थी शोधून काढण्यासाठी हा उपक्रम राबविला जातो. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान संचालनालयाच्या अधिपत्याखाली एनसीईआरटी व विज्ञान प्रसार यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

Related posts: