|Monday, June 24, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » मुंबईत साकारणार बुर्ज खलिफापेक्षाही उंच इमारत

मुंबईत साकारणार बुर्ज खलिफापेक्षाही उंच इमारत 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

जगातील सर्वात मोठी इमारत अशी ओळख असलेल्या बुर्ज खलिफा या इमारतीपेक्षाही मोठी इमारत मुंबईत बांधण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. याबाबत योजना तयार असून केवळ कॅबिनेटच्या मंजुरीची वाट पाहत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

गडकरींच्या या ड्रीम प्रोजेक्टपर्यंत पोहोचण्यासाठी मरीन ड्राव्हपेक्षाही मोठा रस्ता तयार केला जाईल. या रस्त्याच्या दुतर्फा झाड असणार आहेत. वृत्तसंस्था पीटीआयसोबत बोलताना गडकरी म्हणाले, मुंबईत आमच्याकडे सर्वात जास्त जमीन आहे. प्रसिद्ध ताज हॉटेल, बलार्ड एस्टेट, रिलायन्स बिल्डिंग यांचे आम्ही मालक आहोत. बंदराला लागून असलेली जमीन विकसित करणार आहोत. ही योजना अत्यंत चांगली असून या योजनेसाठी केंद्र सरकारकडून हिरवा कंदील येण्याच वाट पाहत आहोत.